Pune Metro: पुणेकरांचं मेट्रोप्रेम! गणेशोत्सवाच्या दहा दिवसात २० लाखांपेक्षा जास्त जणांनी केला प्रवास; विसर्जनाच्या २४ तासात रेकॉर्ड ब्रेक

Pune Metro Income: मेट्रोचा शहरात जसा विस्तार होत आहे तसा प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. यातील वनाज ते रामवाडी मार्गावर सर्वाधिक प्रतिसाद आहे. यामुळे मेट्रोच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोने प्रारंभी रात्री १२ पर्यंत आणि नंतर मध्यरात्री दोन पर्यंत सेवा सुरु ठेवली.
Pune Metro: पुणेकरांचं मेट्रोप्रेम! गणेशोत्सवाच्या दहा दिवसात २० लाखांपेक्षा जास्त जणांनी केला प्रवास; विसर्जनाच्या २४ तासात रेकॉर्ड ब्रेक
Updated on

Pune Ganapati visarjan 2024: पुण्यातला गणपती उत्सव देशात आकर्षणाचा विषय आहे. खास गणपती उत्सवासाठी बाहेरुन पुण्यात येणाऱ्यांची संख्या जास्त असते. पुणेकरही बाप्पाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडत असतात.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये पुणेकरांनी प्रवासासाठी मेट्रोला प्राधान्य दिल्याचं दिसून येतंय. ७ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ या काळात तब्बल २० लाख ४४ हजार ३४२ प्रवाशांनी मेट्रोला प्राधान्य दिलं.

एवढंच नाही तर १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळी ६ ते १८ सप्टेंबर २०२४ रोजीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत; या २४ तासांमध्ये ३ लाख ४६ हजार ६३३ प्रवाशी संख्येने नवा विक्रम नोंदवला.

मेट्रोचा शहरात जसा विस्तार होत आहे तसा प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. यातील वनाज ते रामवाडी मार्गावर सर्वाधिक प्रतिसाद आहे. यामुळे मेट्रोच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोने प्रारंभी रात्री १२ पर्यंत आणि नंतर मध्यरात्री दोन पर्यंत सेवा सुरु ठेवली.

Pune Metro: पुणेकरांचं मेट्रोप्रेम! गणेशोत्सवाच्या दहा दिवसात २० लाखांपेक्षा जास्त जणांनी केला प्रवास; विसर्जनाच्या २४ तासात रेकॉर्ड ब्रेक
One Nation One Election: ''एवढंच वाटतंय तर चार वर्षांपासून...'', राज ठाकरेंची मोदी सरकारवर पोस्ट

आकडे काय सांगतात?

विसर्जनाला उच्चांक

अनंत चतुर्दशीला मेट्रोची सेवा २४ तास सुरु होती. त्यामुळे मेट्रोला विक्रमी उत्पन्न मिळाले.

३ लाख ४६ हजार ६३३ः प्रवासी

५४ लाख ९२ हजार ४१२ः उत्पन्न

इतर दिवशीही प्रतिसाद

गणेश प्रतिष्ठापनाः प्रवासी- १ लाख १७ हजार ७२३, उत्पन्न- १४ लाख ४६ हजार १५०

शनिवार (ता. १४)ः प्रवासी- २ लाख ४३ हजार ४३५, उत्पन्न- २९ लाख ७३ हजार ५८९

रविवार (ता. १५)ः प्रवासी- २ लाख २५ हजार ६४४, उत्पन्न- २७ लाख ९५ हजार ४३२

सोमवार (ता. १६)ः प्रवासी- १ लाख ६६ हजार ५३४, उत्पन्न- २८ लाख ९ हजार ६४९

स्थानकांनुसार प्रतिसाद

१. पीएमसीः प्रवासी- ३ लाख ११ हजार ५७८, उत्पन्नः ४१ लाख ६० हजार ५१४

२. पीसीएमसीः प्रवासी- २ लाख ८० हजार ८०८, उत्पन्नः ४३ लाख २४ हजार ५५५

३. रामवाडीः प्रवासी- १ लाख ५८ हजार ६९३, उत्पन्नः ३० लाख २० हजार ४७९

४. पुणे रेल्वे स्थानकः प्रवासी- १ लाख ३६ हजार ७२५, उत्पन्न- २० लाख ३ हजार ८१५

५. डेक्कन जिमखानाः प्रवासी- १ लाख ३५ हजार ७३४, उत्पन्न- १८ लाख ६३ हजार ६१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.