पुणे : पोलिस संरक्षणात मेट्रोला (Metro) काम सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. त्यामुळे हे काम महापालिका (Corporation) थांबवू शकत नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्पष्ट केले. तर आम्ही शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांना भेटूच, पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची चूक पुणेकरांसमोर येऊ नये म्हणून आम्हाला बोलू दिले नाही असा आरोप विरोधकांनी केला. महापालिकेच्या मुख्यसभेत गोंधळ झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोपांचे बाण सोडले.
‘‘तीन महिने वारंवार बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, पण तोडगा निघू शकला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ डिसेंबर रोजी बैठक घेऊन पोलिस बंदोबस्तात काम सुरू करा असे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊया म्हणले तरीही विरोधक तयार झाले नाहीत.विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत.’’
- मुरलीधर मोहोळ, महापौर
‘‘सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर चर्चा करू, शिष्टमंडळ निश्चित करून असे सांगितले. पण विरोधकांपैकी एकही जण महापौरांकडे आला नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे.’’
- गणेश बीडकर, सभागृहनेते
‘‘विकास आणि संस्कृतीला गणेशोत्सव सोबत घेऊन जातो. आज पर्यंत समाजाची गरज ओळखून सरकारसोबत गणेश मंडळे आली, त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले नाही.’’
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
‘‘प्रत्येक समस्येवर चर्चेतून मार्ग निघू शकतो, पण महापौरांनी मेट्रोवर चर्चा करू दिली नाही. आमचे म्हणणे ऐकले गेले नाही.’’
- दीपाली धुमाळ, विरोधीपक्षनेत्या
‘‘भाजपमुळेच ही मार्गीका चुकल्याचे समोर येऊ देऊ नये म्हणून भाजपने आम्हाला बोलू दिले नाही. मिरवणुकीला अडथळा ठरणारे या पिलरची उंची वाढविण्यासाठी २८ कोटी लागले तरी चालेल. पण संस्कृतीबाबत तडजोड केली जाणार नाही.’’
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
‘‘मेट्रोचा मार्ग जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होता, पण तो नंतर नदीतून नेण्यात आला. हा डीपीआर महापालिकेत मंजूर केला नाही. भाजप मुह मे राम बगल मे छुरी असे भाजप वागत आहे’’
- आबा बागूल, गटनेते काँग्रेस
‘‘महापौरांनी जबाबदारीचे भान राखून बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग बदलल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे.’’
- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.