Pune : स्थलांतरित मजुरांना मिळेना काम; मजूर अड्ड्यांवर तासन् तास प्रतिक्षा

महिला मजुराला ४०० ते ५०० रुपये तर पुरुष मजुराला ६०० ते ७०० रुपये हजेरी आहे. त्यापेक्षा कमी दरात काम करायला तयार आहोत, पण काम मिळत नाही.
Pune
Pune Sakal
Updated on

कात्रज - मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने शहराच्या कात्रज, कोंढवा, आंबेगाव, धनकवडी आदी भागात येतात. यात अनेकजण अशिक्षित असल्याने रोजगार मिळावा म्हणून मजूर अड्ड्यांचा आधार घेतात.

कात्रज परिसरातील दत्तनगर रस्ता, कात्रज चौक, गोकुळनगर चौकाजवळील एसबीआय बँकेसमोर मजूरांचे अड्डे आहेत. मात्र, या मजूर अड्ड्यांवर तासन् तास प्रतिक्षा करुनही मजूरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे प्राथमिक चित्र सध्या दिसून येते.

Pune
Mumbai High Court : रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल प्रकरण हायकोर्टात! मुंबईसह परिसरातील ६ मनपा आयुक्त कोर्टात हजर

महिला मजुराला ४०० ते ५०० रुपये तर पुरुष मजुराला ६०० ते ७०० रुपये हजेरी आहे. त्यापेक्षा कमी दरात काम करायला तयार आहोत, पण काम मिळत नाही, आठवड्यातील सातही दिवस आम्ही मजूर अड्ड्यांवर येतो. मात्र, यातील केवळ तीन किंवा चार दिवस काम मिळते. कधीकधी दुपारच्या बारापर्यंत काम मिळेल म्हणून वाट पाहतो.

Pune
Pune Chandani Chowk : चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण! पाहा भव्यदिव्य पुलाचा ड्रोन Video

आणि आणलेले जेवण इथेच खाऊन घरी जातो अशी खंत विष्णू मोरे या मूळच्या परभणी जिल्ह्यातील कामगाराने व्यक्त केली. घरभाडे, किराणा धान्य व भाजीपाल्याचा खर्च असतो. या सर्वांची जुळवाजुळव करणे कठीण होऊन जाते.

दररोज रोजगार मिळाला तर कमी अडचणी येतात. पण, दररोज कामच मिळत नाही त्यामुळे आमचे जगणे कठीण झाले असल्याचे उत्तरप्रदेशातून आलेल्या सूरज मौर्य यांनी सांगितले. २० ते २५ वर्षांच्या तरुणांपासून ते ६० ते ६५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मजूर या अड्ड्यांवर दिसून येतात. हाताला काम मिळावे या अपेक्षेने सकाळच्या आठ वाजल्यापासून ते उभे राहतात.

Pune
Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे

एखादा दुचाकीस्वार आला की, काम मागण्यासाठी मजूर घोळका करत त्याच्याभोवती जमतात. सगळ्यांनाच कामाची गरज असते. परंतु तो एखाद्यालाच घेऊन जातो. प्रत्येकाला आशा असते, परंतु तिची फलश्रुती होईलच असे नाही. मजूरांच्या चेहऱ्याकडे पाहून मात्र, केवळ दोन वेळच्या अन्नासाठीची ओढ मन सुन्न करणारी आहे, हे लक्षात येते.

Pune
Mumbai Crime : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल

मी रेणापूरचा असून माझी बारावी झाली आहे. कायम,नोकरी नाही. गावाकडे शेती कमी असल्याने आईवडीलही मजूरी करतात. म्हणून मी इकडे आलो. मित्राजवळ राहतो. दररोजचा खर्च भागविणेही कठीण आहे. त्यामुळे कायमचे काहीतरी काम मिळेपर्यंत असेच काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

- राजेश गायकवाड, मजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.