पुणे - विद्यापीठाने बी.कॉम.च्या प्रथम वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर केले. मात्र, आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी नापास झाले. कुणालाच द्वितीय सत्राचा एकही गुण मिळाला नाही, म्हणून विद्यापीठात चौकशी केली तर महाविद्यालयानेच वेळेत गुण पाठवले नसल्याचे कळाले.
महाविद्यालय मात्र रोज नवनवीन उत्तरे देत आहे. आता तर पुन्हा परीक्षेचा अर्ज भरा, असेही सूचविले जात आहे. आमची चूक नसतानाही हा भूर्दंड आम्हाला का, असा प्रश्न शिक्रापूरच्या कस्तुरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने उपस्थित केला आहे.
महाविद्यालयात दाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी थेट सकाळशी संपर्क साधला. विद्यार्थी म्हणतात, " महाविद्यालयातील सर्वांचा निकाल नापास आल्याने आम्ही जरा दचकलोच. फक्त द्वितीय सत्राचे सर्व विषय सर्वच विद्यार्थी कसे अनुत्तीर्ण होतील, हा प्रश्न आम्हाला पडला. म्हणून महाविद्यालयात विचारले असता त्यांनी विद्यापीठात जायला सांगितले.
तिथे गेल्यावर गुण वेळेत मिळाले नसल्याचे समजले. याबद्दल जाब विचारले असता आमचे महाविद्यालय अरेरावीची भूमिका घेते. आमच्यातील काहींनी तर पोलीस स्टेशमध्येही दाद मागितली होती." अनेकांना पुढील वर्षात प्रवेश घ्यायचा आहे तर काहींना दूसरीकडे जायचे आहे. वेळेत निकाल न मिळाल्यामुळे आम्ही सर्व संभ्रमात आणि प्रचंड तानतनावात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे जलद निकाल..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा जलद निकाल प्रक्रिया राबवली आहे. त्यासाठी विहीत मुदतीत महाविद्यालयांनी पेपर तपासून गुणदान पाठवण्याची गरज होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी विहीत मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणून त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांचे निकालही पुढील टप्प्यात जलदगतीने घोषीत होतील, असे या आधीच परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
बी.कॉम.च्या प्रथम वर्षाचे गुण महाविद्यालयाकडून पाठविण्यात आले आहे. त्यासंबंधीचे कागदपत्रेही आम्ही विद्यार्थ्यांना दाखवीले आहे. तसेच लवकरच निकाल विद्यापीठ घोषीत करेल, असेही विद्यार्थ्यांना सांगितले असून, त्यांना कोणतीही तक्रार नाही. विद्यार्थ्यांना आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करत आहोत.
- डॉ. पंडीत पलांडे, संस्थापक, कस्तुरी शिक्षण संस्था, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.