Pune Crime: दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, मुलींना आमिष दाखवून पळवल्याची तक्रार

Pune Crime: संगमवाडी भागातील एक १४ वर्षीय मुलगी रविवारी (ता. २९) सायंकाळी भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेली. परंतु ती अद्याप घरी परतलीच नाही.
girls missing
girls missing sakal
Updated on

पुणे, ता. शहरातील संगमवाडी आणि अप्पर इंदिरानगरमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुलींना कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

girls missing
Pune Crime News: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट! पोलिस तपासामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

याबाबत मुलींच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी भागातील एक १४ वर्षीय मुलगी रविवारी (ता. २९) सायंकाळी भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेली. परंतु ती अद्याप घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. परंतु ती न सापडल्याने वडिलांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तसेच, कोंढवा बुद्रूक येथील एका १७ वर्षीय मुलीने मैत्रिणीचा वाढदिवस आहे, अप्पर इंदिरानगरमधील तिच्या घरी जाते, असे सांगितले. परंतु ती अद्याप घरी परतली नाही. या प्रकरणाचा तपास येरवडा आणि बिबवेवाडी पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.