Pune : सासवडला ३ जुलैपासून आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण

आंदोलन नियोजन बैठकीत वीज महावितरणबाबत अडचणी मांडण्यासाठी शेतकरी नागरीकांना आवाहन
Pune
Punesakal
Updated on

Pune - पुरंदर तालुक्यात वीज महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार, गैरकारभार, अकार्यक्षमता, अरेरावीचे धोरण याच्या विरोधात ३ जुलैपासून पुरंदर - हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप सासवड येथील शिवतीर्थावर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरीक, वीजग्राहक, शेतकरी, व्यावसायिक आदींच्या महावितरण बाबत ज्या काही तक्रारी, अडचणी असल्यास त्यांनी पुरंदर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात तसेच माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपात अडचणी मांडाव्यात.

तसेच हे आंदोलन कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचे नसून महावितरणकडून त्रास होत असलेल्या प्रत्येक घटकासाठी असल्याने या `जनआक्रोश` आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी यानिमित्त केले आहे.

Pune
Mumbai Rain Update : पाऊस लांबल्यामुळे मुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात

वीज महावितरणच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराविरोधात आमदार संजय जगताप यांनी जनआंदोलन छेडत थेट आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरीकांसोबत नियोजनाची बैठक सासवडला झाली.

यामध्ये आमदार संजय जगताप यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज महावितरणबाबत असलेल्या अडचणी मांडण्याचे आवाहन करीत याबाबत सर्वसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्या जास्तीत जास्त अडचणी समोर याव्यात यासाठी जनजागृती करण्याबाबत सुचना दिल्या.

Pune
Pune : दिशादर्शक फलकांच्या चोरी प्रकरणी एकास अटक : ४० हजार रुपये किमतीचे १३ फलक हस्तगत

गेल्या वर्षभरात अनेकदा महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी तसेच निदर्शनास आलेल्या गंभीर त्रुटी, चुकांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी सांगून त्यांच्या वर्तनात आणि कारभारात फरक पडला नाही. या आठवड्यात संबंधीत वीज अभियंता, अधिकारी यांची बैठक घेऊन उपोषणाचा इशाराही दिला होता. तरीही वीज यंत्रणेने आवश्यक दखल अद्यापी घेतली नाही.

त्यामुळे उपोषणावर ठाम असल्याचे व तीन जुलैपासून उपोषण सुरु करीत असल्याचे आमदार श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. शासनाची मंजूर असलेली ८६ रोहित्र सर्वसामान्य नागरीकांसाठी न बसविता ती व्यावसायिक आणि कारखानदारांच्या सोयीसाठी भ्रष्टाचार करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

Pune
Mumbai Rain Update : पाऊस लांबल्यामुळे मुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात

विजजोड, खांब, तारा, मिटर व वीज यंत्रणेचे इतर साहित्य देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. शेतीपंपाचे मिटर रीडिंग न घेता अंदाजे हजारो रुपयांची वीजबीले शेतकऱ्यांच्या माथी मारुन ती भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. या आणि यांसारख्या अनेक अडचणी, समस्या वीज महावितरणकडून निर्माण करून ग्राहकांना मनस्ताप देण्यात येत आहे.

वीज महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाजातील सर्वच घटकांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी, अधिका-यांचा मुजोरपणा आणि भ्रष्ट कारभार मोडीत काढून त्यांना वठणीवर आणण्यासाठी मला नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे आमदार संजय जगताप यांनी या नियोजन बैठकीप्रसंगी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.