Pune : मुलाचे शिक्षण संभाळत आई झाली पोलिस उपनिरीक्षक

लग्नाची घडी विस्कळीत झाली, अंगावर मुलाची जबाबदारी होती. मुलाला घेऊन ती माहेरी आली आई वडलांची खंबीर साथ तिला मिळाला.
PSI
PSI Sakal
Updated on

शिवाजीनगर - वडार समाजाची कन्या स्नेहा विलास पवार ही पुणे जिल्यातील वडारवाडी सारख्या वस्ती मद्ये राहते. तिचे वडील वेल्डर आहेत.शिक्षणाची आवड लहानपणापासूनच अंगात होती पण बारावीत असतानाच लग्न लावून दिलं गेल. लग्नानंतर संसारात रमलेल्या स्नेहा'ला बाळ झालं आणि शिक्षणात ३ वर्षाचा गॅप झाला.

लग्नाची घडी विस्कळीत झाली, अंगावर मुलाची जबाबदारी होती. मुलाला घेऊन ती माहेरी आली आई वडलांची खंबीर साथ तिला मिळाला.हतबल न होता तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मधुन बाहेरून बीकॉम शिक्षण पूर्ण केल. काही कारणास्तव तिला पोलिस चौकीत जावं लागलं, तिथे गेल्यानंतर एका लेडी महिला पोलिसला तिने पाहिलं,

PSI
Mumbai News : कपडे काढताना रिव्हॉल्वर खाली पडली आणि गोळी सुटून एकजण जखमी

त्या महिलेला तिचा जवळ असणाऱ्या इतर पोलिसांनी सल्युट केल हे चित्र तिचा डोळ्यात बसलं आणि मलाही अस काहीतरी करायचंय या विचाराने ती प्रेरित होऊन तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. लहाण मुलाला घरी आई वडलांकडे ठेऊन ती अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी जायची स्वतःचं शिक्षण, मुलाच शिक्षण दोन्ही जबाबदारी तिन्हे पार पाडली.

PSI
Mumbai : आखाडीचा दणका ! गटारीनिमित्त चिकण, मटणाच्या दरात वाढ

दरम्यान २०२० ची ही परिक्षा ३.५ वर्ष पुढे लांबली गेली ज्यामुळे अनेक मानसिक आर्थिक शारीरिक त्रासाला या मुलांना समोरं जावं लागत होतं .एका प्रकारच संयम या मुलांनी दाखवल. बाळ झाल्यानंतर वजन खूप वाढलं होतं ,अवग्या दोन महिन्यात तिने शारीरिक तापासणीच्या वेळी २१ किलो वजन कमी केल.

मनात एक जिद्ध घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या मुलाला एकट्यानेच पुढे संबाळणार या जिद्दीने पेठून उठलेल्या स्नेहाने एमपीएससी ची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षा पास झाली. ही परीक्षा साडे चार लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. ज्यात ५८३ विद्यार्थी पास झाले.असा सगळा संगर्ष करुन खूप कष्टाने आणि आई वडलांचा आशीर्वादाने स्नेहा पोलिस उपनिरीक्षक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.