पुण्यातील गिर्यारोहकांनी रचला नवा अध्याय

मंदा-१ या सहा हजार ५१० मीटर उंच शिखरावर केली यशस्वीपणे चढाई
पुण्यातील गिर्यारोहकांनी रचला नवा अध्याय
Updated on

पुणे : माउंट मंदा-१ या सहा हजार ५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वीपणे चढाई करत गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला आहे. माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही देशातील पहिली गिर्यारोहण मोहीम आहे. चढार्इ करताना येणा-या सर्व आव्हानांना पेलत ही चढाई यशस्वी केली आहे.

गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी या पूर्वी १९८९ आणि १९९१ अशी दोनवेळी माउंट मंदा-१ ची मोहीम आखली होती. मात्र दोन्ही वेळा संघाला शिखर चढाई करण्यात अपयश आले होते. तब्बल ३२ वर्षांनी गिरीप्रेमी संस्थेला हे यश मिळाले आहे. सतत होणारे हिमप्रपात आणि रॉकफॉलच्या आव्हानांना तोंड देत हिमभेगांना चुकवत, कधी कठीण बर्फाळ मार्गावरून तर कधी भुसभुशीत हिमांतून वाट काढत ७० ते ८० अंश कोनांतील हिमभिंतीचे व अतिशय तीव्र धारेचे आव्हाने स्वीकारत डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला. या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद माळी यांनी केले. तर ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी संघाला मार्गदर्शन केले.

पुण्यातील गिर्यारोहकांनी रचला नवा अध्याय
अनिल परबांकडून सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!

माउंट मंदा-१ या मोहिमेसोबतच केदारगंगा खोऱ्यातील सहा हजार ४१ मीटर उंच ‘माउंट भ्रिगु पर्वत’ या शिखरावर गिरिप्रेमीच्या दुसऱ्या संघाने यशस्वी चढाई केली. या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी व रोहन देसाई यांनी सहभाग घेत शिखर चढाई यशस्वी केली. विशेष म्हणजे माउंट भ्रिगु पर्वत या शिखरावर ३० वर्षांपूर्वी पहिली यशस्वी मोहीम देखील गिरिप्रेमीनेच केली होती. माउंट मंदा-१ व भ्रिगु पर्वत या दोन्ही मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये व्हाइट मॅजिक या संस्थेने सहकार्य केले.

  • हिमालयातील केदारगंगा खोऱ्यात माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह

  • माउंट मंदा-१ हे शिखर अत्यंत आव्हानात्मक

  • शिखरावर आजपर्यंत बोटावर मोजण्याइतक्या मोहिमा  

  • माउंट मंदा-१ च्या १९८९ व १९९१ सालच्या मोहिमेत गिरिप्रेमीला अपयश

पुण्यातील गिर्यारोहकांनी रचला नवा अध्याय
शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावं: रामदास आठवले

‘‘माउंट मंदा-१ या शिखरावरील चढाई ही माउंट एव्हरेस्ट किंवा माउंट कांचनजुंगा या शिखरावरील चढायांइतकीच कठीण आहे. मात्र, गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून शिखर चढाई यशस्वी केली याचा आनंद आहे. या शिखरावरील यशस्वी मोहीम भारतीय गिर्यारोहण प्रवासाला कलाटणी देणारी घटना आहे. यामुळे भारतीय हिमालयातील आव्हानात्मक शिखरांवर चढाई करण्याचे बळ गिर्यारोहकांना मिळेल.’’

- उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.