MP Prakash Javadekar : लोकसभेच्या ३५० पेक्षा जास्त जागा जिंकू; जावडेकर

जावडेकर म्हणाले, मोदींमुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले.
Prakash Javadekar
Prakash Javadekarsakal
Updated on

MP Prakash Javadekar - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'देश प्रथम' निती त्यासाठी सतत कष्ट आणि 'सन्यस्त कर्मयोगी' ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

Prakash Javadekar
Online Counseling : विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा कार्यान्वित

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर बोलत होते. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी यावेळी उपस्थित होते.

Prakash Javadekar
Pune Traffic : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकर पूर्ण करावीत

जावडेकर म्हणाले, मोदींमुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले, लोकांचा मोदींवर विश्वास असल्याने ती आमची मोठी ताकद आहे, या ताकदीवर पुन्हा सत्तेत येऊन २०२४ नंतर विकासाची गती आणखी वाढेल.

मोदींनी विकासाचे सकारात्मक राजकारण करत जात, धर्म, प्रांत, लिंग, यावर भेद केला नाही. स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. गेल्या ९ वर्षात देशातील दहशतवादी हल्ले थांबले, नक्षलवाद्यांचा ९० टक्के प्रभाव कमी झाला, शांतता निर्माण झाली आहे.

Prakash Javadekar
Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

दरम्यान, गॅस पेट्रोल दरवाढीबाबत विचारले असता रशिया युक्रेन युद्धामुळे गॅस आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत.’’ असे जावडेकर यांनी सांगितले.

पहिल्या पाच देशात भारत

२०१४ पूर्वी भारत हा पहिल्या पाच कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत होता. पण आता भारत हा सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने अद्भुत यश मिळवले.

जगात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. युरोपातील अनेक देशात मंदीचे सावट असताना भारताची वेगवान प्रगती चालू आहे. गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे, असा दावा जावडेकर यांनी केला.

मोदी सरकारची नऊ वर्षातील कामगिरी

- ५० हजार किलोमीटरचे नवे महामार्ग, ७० नवे विमानतळ, १११ नवे जलवाहतूक मार्ग, २० शहरात मेट्रो, 18 वंदे भारत एक्स्प्रेस

- १०० कोटी नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस,५० कोटी नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

-११ कोटी शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी प्रत्येकी 26 हजार रुपये, ४८8 कोटी नागरिकांची जनधन खाते.

- ११ कोटी घरात शौचालय, १० कोटी महिलांना उज्वल गॅस योजना, १० कोटी घरात नव्याने नळ जोडणी,

- ३.५ कोटी कोटी नागरिकांना प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.