Pune MPSC Agitation: कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, पण काही संघटना अद्याप आंदोलनावर ठाम

MPSC Agriculture Department students कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट कनिष्ठ मधील २५८ जागांसाठी परीक्षा व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. मात्र, २५ तारखेच्या परीक्षेत पदांची वाढ होणार नाही असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे.
MPSC
MPSC
Updated on

Pune MPSC students Agitation: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यात काल रात्रीपासून आंदोलन सुरु आहे. २५ ऑगस्ट रोजी एमपीएसची परीक्षा होणार आहे. याच वेळी कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट कनिष्ठ मधील २५८ जागांसाठी परीक्षा व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. मात्र, २५ तारखेच्या परीक्षेत पदांची वाढ होणार नाही असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे.

पुण्यातील शास्त्रीनगर परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरुच आहे. आज सकाळी देखील काही संघटना आंदोलन करत आहेत. २५ तारखेला होणाऱ्या परीक्षेत पदांची वाढ करा अशी विद्यार्थांची मागणी आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य झाली नसली तरी आयोगाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

MPSC
MPSC Exam 2023: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचं शेड्युल जाहीर; 'या' तारखा ठेवा नोंदवून
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.