Pune News: कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

Pune Latest News: जून २०२३ मध्ये पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी तेथे हजर असलेल्या लेशपाल जवळगे या विद्यार्थ्याने जीवावर उदार होत तरुणीचा जीव वाचवला होता.
Pune News: कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?
Updated on

Leshpal Javalage: पुण्यात एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने केलेला हल्ला मोठ्या हिमतीने रोखून तिचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लेशपाल याच्यासह आणखी सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

एमपीएससी आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आल्याने एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यासाठी एमपीएससीचे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत होते. गुरुवारी एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचं आंदोलन इतर मागण्यांसाठी सुरुच होतं.

पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवार यांनी भेट दिली होती. एमपीएससीने मागणी मान्य करुनही आंदोलन सुरुच ठेवल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. आंदोलानाचं नेतृत्व करणाऱ्या लेशपाल जवळगे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

''विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं होतं, तरीही वारंवार विद्यार्थी रस्ता अडवून बसत आहेत. त्यांना विनंती करुही ऐकत नाहीत. त्यामुळे आता आम्ही त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात आहोत.'' अशी प्रतिक्रिया पोलिसांनी अटकेनंतर दिली.

Pune News: कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?
Assembly Election: आरक्षणाबाबत एकवाक्यता नाही; भाजप नेता जरांगेच्या भेटीला, विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी

MPSC ने परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्टरोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. गुरुवारी आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थी आंदोलनावर ठाम

महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांचा २५ ऑगस्ट रोजीच्या एमपीएससी परीक्षेमध्ये समावेश करावा, अशा मागणीसाठी देखील विद्यार्थी आंदोलन करत होते. कृषी विभागातील या २५८ जागांचा समावेश यात करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यावर विद्यार्थी ठाम आहेत.

कोण आहे लेशपाल जवळगे?

जून २०२३ मध्ये पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी तेथे हजर असलेल्या लेशपाल जवळगे या विद्यार्थ्याने जीवावर उदार होत तरुणीचा जीव वाचवला होता. त्यानंतर राज ठाकरेंसह अनेक राजकीय पक्ष आणि समाजिक संघटनांनी लेशपालचं कौतुक करुन बक्षीस जाहीर केलं होतं. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्याला बक्षीस जाहीर केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.