सजग नागरिक मंचातर्फे ‘पुणे महापालिकेच्या खर्चिक नदीकाठ विकसन प्रकल्पाला पर्यावरणस्नेही अत्यल्प खर्चिक पर्याय’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते.
पुणे - नदीपात्रात मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण, भराव टाकून व कोट्यवधी रुपये खर्च करून मुळा-मुठेचे (Mula Mutha River) संवर्धन होण्याऐवजी शहराला मोठा धोका (Danger) निर्माण होणार आहे. त्याऐवजी कमी खर्चात व पुणेकरांना सोबत घेऊन नैसर्गिक पद्धतीने (Natural Process) नदीचे संवर्धन करणे शक्य आहे, अशी भूमिका नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या तीन संस्थांनी मांडली.
सजग नागरिक मंचातर्फे ‘पुणे महापालिकेच्या खर्चिक नदीकाठ विकसन प्रकल्पाला पर्यावरणस्नेही अत्यल्प खर्चिक पर्याय’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. जीवितनदी, ऑइकॉस आणि स्टुडिओ रुट्स या संस्थांनी नदी सुधारणा प्रकल्पास पर्याय देणारे सादरीकरण केले. पुणे महापालिकेने मुळा-मुठा नदीचा ४४ किलोमीटरचा नदीकाठ सुशोभित करण्यासाठी ४ हजार ७०० कोटीचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. ११ टप्प्यांमध्ये हे काम केले जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हे सादरीकरण आयोजित केले होते.
प्राची वाळके यांनी औंध स्मशानभूमी येथील मुळा नदीकाठ संवर्धनाचा आराखडा सादर केला. तर, केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी मुठा नदीकाठावरील विठ्ठलवाडी येथील नदीच्या संवर्धनासाठीचे सादरीकरण केले. या दोन्ही सादरीकरणात ‘नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा करणाऱ्या भिंती, राडारोडा काढून टाकावा, नदीकाठच्या झाडांचे, पाणथळ ठिकाण सुरक्षित ठेवल्यास पुराचा धोका कमी होईल व जैवविविधताही कायम राहिल. कचरा आणि सांडपाणी नदीत येणे बंद झाल्यास नदी पात्र नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल. नदीतील सजीवांचा अधिवास वाढेल, असे या सादरीकरणात सांगण्यात आले, अशी भूमिका या सादरीकरणातून मांडण्यात आली.
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या, शहरातील नद्या हा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वातावरणातील बदलांमुळे आता कमी वेळेत जास्त पाऊस पडत असताना अशा प्रकारे नदीपात्रांशी छेडछाड करणे शहरासाठी धोकादायक आहे. त्यासाठी नदीचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन आवश्यक आहे.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या वेळी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.