पुणे : आंबेगावमध्ये अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

आमचा संसार पालिकेने उध्वस्त केला; नागरिकांची व्यथा
ambegaon
ambegaonsakal
Updated on

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव खुर्द दत्तनगर जांभूळवाडी रस्ता सर्व्हे नं ६० सिद्धिविनायक सोसायटीतील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेकडून आज (दि.२६) कारवाई करण्यात आली. यामध्ये, दुर्गा हाईट्स ही सहा मजली अनधिकृत इमारत पाडण्यात आली आहे. सदरील इमारती मध्ये तीस सदनिका असून, या तीसही सदनिका विकल्या गेल्या होत्या. आज सकाळी अकरा वाजले पासून महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग २ कडून, कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्या निदर्शनाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईमध्ये, दोन जेसीबी मशीन, एक जॉ कटर मशीन व दोन ब्रेकरचा वापर करण्यात आला.

आंबेगाव खुर्दचा परिसर हा झपाट्याने विकसित होतो आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे कमी पैश्यात भक्कम घर मिळत असल्याने नागरिकांनी अशा अनाधिकृत इमारतीमध्ये सदनिका विकत घेतल्या. शिवाय कोरोना काळात दाट लोकवस्त्यामधील काही कुटुंबं बाहेर वास्तव्यास पडली होती. या इमारतीमध्ये अशी कुटुंबं वास्तव्यास होती. परंतु, आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे.

ambegaon
प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हावे

यावेळी, शहर बांधकाम विभाग २ चे उप अभियंता कैलास कराळे, प्रकाश पायगुडे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर, संदेश पाटील, प्रशांत मोरे, धनंजय खोले, निशिकांत छापेकर,बाळासाहेब बडदे यांचेसह भारती विद्यापीठ पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सोसायट्यांचे काम पूर्ण होई पर्यंत महापालिका करवाई करत नाही. सहा सहा मजले झाल्यानंतर कारवाई केली जाते या दिरंगाईचे कारण काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

ambegaon
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका पुन्हा बदलली

'आंबेगाव बुद्रुक व खुर्द परिसरातील वाढलेल्या अनाधिकृत बांधकामांवर इथून पुढे सतत कारवाया करण्यात येणार आहेत. सर्व्हे नं ६० मधील आणखी चार ते सहा अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.'

-प्रकाश धायगुडे, उप अभियंता, शहर बांधकाम विभाग २

'कारवाई करण्याअगोदर प्रशासनाने लोकांचा विचार करायला हवा. सर्वसामान्य नागरिकांनी याठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. कामगार वर्ग याठिकाणी राहतो आहे.'

-कैलास भोसले, स्थानिक रहिवासी.

'नोटीस दोन दिवस अगोदर आली. घरात साहित्य तसेच पडून आहे. आमचा संसार पालिकेने उध्वस्त केला आहेच किमान आमच्या राहण्याची पर्यायी सोय तरी करावी.'

-राम असरे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.