राष्ट्रपतींचा दौरा पुणेकरांच्या पथ्यावर, पाणीकपात तात्काळ मागे

गुरुवारी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहणार
Rashtrapati Ramnath Kovind
Rashtrapati Ramnath Kovindesakal
Updated on

पुण्यात गुरुवारी होणारी पाणीकपात मागे घेण्यात आलीय.

शहरातील पर्वती, लष्कर, SNDT, होळकर व वारजे पाणी पुरवठा झोन अंतर्गत दुरुस्ती कारणाने पाणी पुरवठा बंद करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

गुरुवारी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहील अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली

शहरातील पर्वती, लष्कर, एसएनडीटी, होळकर व वारजे पाणी पुरवठा विभागात विद्युत व स्थापत्य विषयत अंतर्गत दुरुस्ती निमित्त गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असेल असे जाहीर केले होते. पण राष्ट्रपती कोवींद हे शुक्रवारी पुणे दौर्यावर आहेत. महापालिकेकडून एक दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याचा परिणाम पुढील एक ते दोन दिवस होतो.

अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामे नंतर केली जाणार आहेत. उन्हाळ्यात महापालिकेने पाणी बंदचा निर्णय मागे घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.