Property Tax : मोठी बातमी! पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावातही मिळकत करात ४० टक्के सवलत

पुणे महापालिकेत २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतकर विभागाने यंदापासून कर आकारणी सुरू केली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेत २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतकर विभागाने यंदापासून कर आकारणी सुरू केली आहे.

पुणे - पुणे महापालिकेत २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतकर विभागाने यंदापासून कर आकारणी सुरू केली आहे. तेथील निवासी मिळकतींना ४० टक्क्यांची सवलत देण्यात आलेली नव्हती. पण आता महापालिकेकडून २३ गावात ग्रामपंचायतींकडे नोंद असलेल्या मिळकतींसह २०२१ नंतर महापालिकेकडे नोंद झालेल्या मिळकतींनाही ही सवलत लागू होणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे १९७० पासून स्वतः राहत असलेल्या एका मिळकतीला ४० टक्के सवलत दिली जात होती. ही सवलत एप्रिल २०१९ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे ४० टक्के करवाढ झाल्याने पुणेकरांचे कंबरडे मोडले. ज्या नागरिकांना कर भरावा लागला, नोटिसा पाठविण्यात आल्या, त्यांना मिळकतकराची रक्कम बघून डोळे पांढरे होण्याची वेळी आली.

२०१९ ते २०२२ या कालावधीत सुमारे सुमारे दोन लाख नागरिकांनी अडीचशे कोटीची रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. आता ही ४० टक्के सवलत पुन्हा एकदा लागू झाल्याने ज्या नागरिकांनी पैसे भरले त्यांची ही रक्कम पुढील चार वर्षात मिळकतकरात वळती केली जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महापालिकेत २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे २३ गावांमध्ये ४० टक्क्यांबाबत संभ्रम आहे. राज्य सरकारने २०१९ पासून ४० टक्के सवलत रद्द केली. ही गावे २०२१ मध्ये महापालिकेत आली असल्याने त्यांना ४० टक्के सवलत यापूर्वी दिलेली नव्हती. तसेच अनेक जण अशी सवलत असल्याबद्दल अनभिज्ञ असल्याने या निर्णयाचा आपल्याला काय फायदा होणार की यावरून संभ्रमात होते.

नवीन गावे समाविष्ट झाल्यानंतर पहिल्या वर्षी एकूण कराच्या २० टक्के, दुसऱ्या वर्षी ४० टक्के, तिसऱ्या वर्षी ६० टक्के, चौथ्या वर्षी ८० आणि पाचव्या वर्षी १०० टक्के कर आकारणी करते.

महापालिकेने २०२३-२४ पासून २३ गावात २० टक्के कर आकारणी करणार आहे. पण त्यामध्ये ४० टक्क्याचा समावेश नव्हता. मात्र, राज्य सरकारने सवलत पुन्हा लागू केल्याने आता तेथील मिळकतधारकांना ४० टक्के सलवतीसह बिल पाठविले जाणार आहे. मात्र, या नागरिकांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ते मिळकतीमध्ये स्वतः राहत असल्याचा पुरावा महापालिकेकडे जमा करणे आवश्‍यक आहे.

‘२०२१ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये यंदा एकूण कराच्या २० टक्के कर आकारला जाणार आहे. तेथे निवासी मिळकतीमध्ये स्वतः राहणाऱ्या मिळकतधारकास ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. पण अशा नागरिकांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ते मिळकतीमध्ये स्वतः राहत असल्याचे पुरावे महापालिकेकडे जमा करावेत, अन्यथा पुढच्या वर्षाच्या करात ही सवलत मिळणार नाही.’

- अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग

‘पुणे महापालिकेतर्फे मिळकतकरात ४० टक्के सवलत दिली जाणार असली तरी २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांना ती मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. सवलत मिळणार असलेल्या ज्या नागरिकांनी यापूर्वी कर भरला आहे. त्यांची ही रक्कम पुढील बिलात वळती करून घ्यावी.’

- माधवी सोळसकर, नागरिक

२३ गावातील मिळकतींची स्थिती

  • निवासी मिळकती - १, ८२, १६४

  • बिगरनिवासी मिळकती - १४,३५१

  • मोकळ्या जागा - ७००

  • मिश्र - ३७१९

  • एकूण मिळकती - २,००,९३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()