पुणे : बंद सीसीटीव्हीकडे पुणे महापालिका अन पोलिसांचेही दुर्लक्ष

सीसीटीव्ही बंद असल्याने स्वर्णव कदम या अपहरण झालेल्या लहान मुलाचा शोध घेताना पोलिसांना प्रचंड अडचणी
Pune Municipal Corporation police ignore CCTV
Pune Municipal Corporation police ignore CCTV sakal
Updated on

पुणे : स्मार्टसिटी योजनेचा रोलमॉडेल म्हणून बाणेर, बालेवाडीच्या भागाचा महापालिका नेहमी गौरव करते. मात्र, हा भाग नावालाच स्मार्ट असल्याचे समोर आले आहे. या भागातील सीसीटीव्ही बंद असल्याने स्वर्णव कदम या अपहरण झालेल्या लहान मुलाचा शोध घेताना पोलिसांना प्रचंड अडचणी आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या भागातील सीसीटीव्ही बंद असल्याचे महापालिकेला माहितीच नव्हते, तर याचे नियंत्रण पोलिसांकडे असूनही त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.(Pune Municipal Corporation and police also ignore closed CCTV)

Pune Municipal Corporation police ignore CCTV
लालपरी धावणार! एसटी महामंडळाने काढला नवा पर्याय; 'असे' असतील नवे कर्मचारी

बाणेर भागातील हायस्ट्रीय येथील इंदू पार्क सोसायटीजवळून स्वर्णव ऊर्फ गुड्डू या चार वर्षाच्या मुलाचे आठ दिवसांपूर्वी अपहरण झाले. एका सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून त्याला कोणी तरी घेऊन जात असल्याचे समोर आले. स्वर्णवच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध यासह इतर भागातील सीसीटीव्हीचा तपास करून या गुन्ह्याचा शोध करण्याचा प्रयत्न केला. हा भाग स्मार्टसिटीचा असल्याने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याने सहजपणे माग काढता येईल असे पोलिसांना वाटले. सीसीटव्हीचे प्रत्यक्षात फुटेज घेण्याचा प्रयत्न केला असता या भागातील अनेक सीसीटीव्हीच बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे आहे.

Pune Municipal Corporation police ignore CCTV
पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?

स्वर्णवचा शोध लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक चिंताग्रस्त होते. पोलिसांनीही विविध तपास पथके करून दिवसरात्र तपास केला. हे सीसीटीव्ही सुरू राहिले असते तर तपास वेगात तपास सुरू झाला असता असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, महापालिकेने सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलिसांकडे असते, त्यांनी सीसीटीव्ही बंद असल्याचे कळविले असते तर ते त्वरित दुरुस्त झाले असे असे सांगितल्याने यंत्रणांमधील गोंधळ समोर आला आहे.

''बाणेर येथून मुलाचे अपहरण झाले, त्या भागातील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात अडथळे आले. सीसीटीव्ही का बंद होते याची तांत्रिक बाजू काय आहे हे आम्ही महापालिकेला विचारले आहे. त्यांनी हे बंद कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत.’’

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

‘‘बाणेर, बालेवाडी भागात स्मार्टसिटीने सीसीटीव्ही बसवले आहेत. काही भागात महापालिकेचे कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही लावल्यानंतर त्यांचे नियंत्रण पोलिसांकडे दिले जाते, त्यामुळे कोणते कॅमेरे बंद आहेत सुरू आहेत हे आम्हाला कळत नाही. त्यांनी कॅमेरे बंद असल्याचे सांगितले असते तर दुरुस्त केले असते. आताही त्यांनीही माहिती महापालिकेला द्यावी.’’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.