Property Tax : अद्यापही पुणे महापालिकेतील दीड लाख नागरिक मिळकतकर बिलाच्या प्रतिक्षेत

पुणे महापालिकेने मिळतकराची बिले वाटप करण्यास सुरवात केलेली असून, आत्तापर्यंत १० लाख ५२ हजार नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन बिल उपलब्ध झालेले आहे.
property tax
property taxesakal
Updated on

पुणे - महापालिकेने मिळतकराची बिले वाटप करण्यास सुरवात केलेली असून, आत्तापर्यंत १० लाख ५२ हजार नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन बिल उपलब्ध झालेले आहे. मात्र, अद्यापही दीड लाख नागरिक बिलाच्या प्रतिक्षेत आहेत. तर छापील बिले पोस्टाने पाठविण्यास सुरवात झाली असून, या महिना अखेरपर्यंत बिले नागरिकांच्या पत्त्यावर पोहचतील.

मिळकतकराच्या ४० टक्क्याच्या सवलतीवर तोडगा निघाल्यानंतर १५ मे पासून महापालिकेने मिळकतकर स्वीकारण्यास सुरवात केली आहे. १५ मे ते २५ मे या १० दिवसात १२० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मिळकतकर आकारणी उशिरा सुरू केल्याने ५ ते १० टक्के सवलत मिळविण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे या अडीच महिन्यात महापालिकेला १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

property tax
Katraj Zoological Museum : कात्रज प्राणी संग्रहालयात सुट्यांमुळे गर्दी, मात्र सुविधांचा अभाव

४० टक्के सवलत देऊन १५ मेपासून आजपर्यंत मिळकतकारचे १० लाख ६० हजार आॅनलाइन बिल उपलब्ध झाले आहेत. आणखी दीड लाख बिलांचे काम सुरू आहेत. साडेसात लाख बिले हे पोस्टाने पाठवली जाणार आहेत. त्यापैकी साडेचार लाख बिलांची छपाई होऊन ते पोस्टाने पाठवून दिले आहेत. उर्वरित बिले हे ३१ मे पर्यंत पाठविले जातील.

property tax
Pune Crime : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या सहा बुकींना अटक

मेसेज नसल्याने अडचणी

महापालिकेकडे सुमारे साडे दहा लाख नागरिकांचे इमेल व मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. त्यांना दरवर्षी इमेल व मेसेजवरून बिल व पैसे भरण्यासाठी लिंक पाठवली जाते. त्यामुळे आॅनलाइन बिल भरण्याचे प्रमाण वाढते. पण यंदा संगणक विभागाकडे नवीन कंपनीकडे हे काम दिले आहे, त्यांच्याकडून अद्याप ही सुविधा उपलब्ध करून देण्यास आलेली नसल्याने नागरिकांना मेसेज टाकण्यात आलेले नाही. ही सुविधाही सुरू व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.