भावनिक आवाहन, कोपरखळ्या मारत नगरसेवकांनी घेतला निरोप

गोपाळ चिंतल यांनी महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सभागृहातील आठवणी सांगितल्या.
Pune Municipal Corporation corporators term expired today informal meeting
Pune Municipal Corporation corporators term expired today informal meeting sakal
Updated on

पुणे : गेल्या पाच वर्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडणारे नगरसेवक आज मात्र अखेरच्या निरोपाच्या मुख्य सभेत एकमेकांना केलेल्या मदतीची आठवणी सांगत, कोपरखळ्या मारत, काम करताना घडलेल्या गमतीशीर गोष्टींना उजाळा देत शेरोशायरी म्हणत निरोप दिला. तर काही नगरसेविकांना निरोपाचे भाषण करताना अश्रू अनावर झाले.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संपली, त्यामुळे निरोपाची अनौपचारिक मुख्यसभा आयोजित करण्यात आली होती. गोपाळ चिंतल यांनी महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सभागृहातील आठवणी सांगितल्या. ८० कोटी ते आठ हजार कोटी असा बजेटचा प्रवास पाहिला आहे. अनेक बाबी संग्रही करून ठेवण्यासारख्या आहेत, असे चिंतल यांनी सांगिले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मी प्राध्यापक म्हणून काम करताना चुकून नगरसेवक होऊन राजकारणात. अनेक गोष्टी शिकता आल्या. मुक्ता जगताप म्हणाल्या, " गृहिणी म्हणून काम करताना निवडणूक लढवली आणि थेट नगरसेविका म्हणून सभागृहात आले महापालिकेत नेमके कसे काम करतो मला काही माहिती नव्हते पण शहर सुधारणा महिला बालकल्याण समिती म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मार्गदर्शन केले.

नंदा लोणकर यांनी पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला. महिला काय करतील असा प्रश्न विचारला जायचा पण कोरोना च्या काळात सुद्धा आम्ही काम करून दाखवले. भविष्यात महापौर होणारच असे लोणकर यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. त्याचे सर्व नगरसेवकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तर नगरसेविका पल्लवी जावळे यांना बोलताना अश्रू अनावर झाले. यासभेत ३० पेक्षा जास्त नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले.

"गेल्या पाच वर्षातील शहरातील मोठे प्रोजेक्ट सुरू होऊ शकले. त्याचे निर्णय या सभागृहाने घेतले त्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहोत. याचा अभिमान आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यात मतमतांतरे होती, पण विकासात एकत्र होते."

- गणेश बीडकर गटनेते, भाजप

"गेल्या पाच वर्षाचा प्रवास कसा संपला हे कळाले नाही. सत्ताधारी भाजप म्हणून काम केले पण विरोधकांनीही चांगले काम केले. पक्ष, विचार, तत्त्व वेगळे असेल तरी विकासासाठी व कोरोना च्या काळात सत्ताधारी व विरोधक एकत्र होते.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

ड्रेनेज गोल की चौकोनी

न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेच नगरसेवक झालो. पहिल्याच दिवशी नागरिकाचा ड्रेनेज तुंबले असल्याचा फोन आला. ते साफ करण्याचे काम करताना ड्रेनेज आणि चौकोनी अशी दोन प्रकारची असतात. ती साफ करायला वेगवेगळे कर्मचारी आहेत हे नव्यानेच कळाले, याचा समन्वय घालताना कसा गोंधळ उडाला याचा मजेशीर किस्सा भय्यासाहेब जाधव यांनी सभागृहात सांगितला, त्यावेळी सभागृहात हस्यकल्लोळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.