पुणे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्याचा घेतला निर्णय

हवामानात होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना येणारे पूर यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत असणे आवश्‍यक आहे.
Pune Municipal
Pune MunicipalSakal
Updated on

पुणे - हवामानात (Environment) होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना येणारे पूर यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (Disaster Management System) अद्ययावत असणे आवश्‍यक आहे, तरच शहरातील नागरिकांपर्यंत योग्य माहिती त्वरित पोहचू शकते. यासाठी महापालिकेने आता आपत्ती व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेत यंत्रणा उभी केली जाणार आहे. (Pune Municipal Corporation Decided to Update the Disaster Management Department)

पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुख्य पालिका भवनात पाचव्या मजल्यावर आहे. तेथून पोलिसांकडून नियंत्रित केले जाणारे प्रमुख चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मदत क्रमांकावर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी नोंदवून घेऊन त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविल्या जातात. पण, नियंत्रण कक्षातून क्षेत्रीय कार्यालयांना निरोप दिल्यानंतर पुढे काय झाले याची नोंद नियंत्रण कक्षात नसते. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जाणार आहे.

Pune Municipal
सीमावर्ती भागातील दंगलीत गोळीबारात पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली आहे, त्याचप्रमाणे पुण्यातही वॉर रूम उभी केली जाणार आहे. यासाठी नुकताच सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून, सल्लागाराकडून ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डीपीआर) प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून काम केले जाणार आहे.

आपत्तीसह प्रशासनावर लक्ष

आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करताना नागरिकांना मदत करण्यासोबत प्रशासनावर लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, इमारतीची स्वच्छता, घनकचऱ्याचे व्यवस्थापन व वाहतूक, घनकचरा प्रकल्पांवरील स्थिती, स्मशानभूमीमधील प्रदूषण सेंसर, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम, पाणी पुरवठा व्यवस्थापनावर लक्ष दिले जाणार आहे. हा मोठा प्रकल्प असून, पहिल्या टप्प्यात आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी बांधकाम करून, यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यानंतरचा टप्पा प्रशासकीय कामावर नियंत्रणाचा असणार आहे.

Pune Municipal
ड्रोनच्या धोक्यावर अत्याधुनिक यंत्रणांचा उतारा

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची वॉर रूम अद्ययावत केली जाणार आहे, त्यासाठी दोन सल्लागार नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून डीपीआर आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून पुढील पावसाळ्यात नियंत्रण कक्ष सुरू होईल. यामध्ये स्मार्टसिटीचा डेटाबेस महापालिका वापरणार आहे. तसेच पोलिस, अग्निशामक दल, पीएमपी व महापालिकेच्या विविध संगणकीय प्रणालींना एकत्रित आणून कमांड अँड कंट्रोल सेंटर तयार केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या यंत्रणेत काय आहे?

  • उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ४० जणांचे शहरावर लक्ष

  • मुंबई पोलिसांच्या ५००० सीसीटीव्हींचा ॲक्सेस

  • शहरातील स्थितीवर नजर ठेवण्यासाठी डिजिटल वॉल

  • नागरिकांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन

  • प्रत्येक प्रभाग कार्यालयात यंत्रणा

  • ५० पेक्षा जास्त पर्जन्यमापक बसवले आहेत, दर १५ मिनिटांना पावसाचे अपडेट मिळतात

  • संकेतस्थळावरून नागरिकांना माहिती मिळते

  • मोठी दुर्घटना घडल्यावर इतर यंत्रणांसह सतर्क केले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.