Pune Garbage News : आधी होती दुर्गंधी आता होणार ऊर्जा निर्मिती

पुणे शहरातील कचरा वर्षानुवर्षे फुरसुंगी, उरुळी देवाची येथे टाकल्याने या भागात जमीन, पाणी, हवा प्रदूषित झाली. ग्रामस्थांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केल्या, आंदोलने केली.
power generations
power generationssakal
Updated on
Summary

पुणे शहरातील कचरा वर्षानुवर्षे फुरसुंगी, उरुळी देवाची येथे टाकल्याने या भागात जमीन, पाणी, हवा प्रदूषित झाली. ग्रामस्थांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केल्या, आंदोलने केली.

पुणे - शहरातील कचरा वर्षानुवर्षे फुरसुंगी, उरुळी देवाची येथे टाकल्याने या भागात जमीन, पाणी, हवा प्रदूषित झाली. ग्रामस्थांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केल्या, आंदोलने केली. त्यामुळे तेथे आता कचरा टाकणे बंद झाले पण तेथे आता पर्यावरण पूरक महापालिका राबवत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) २ कोटीचा दंड ठोठावला होता, या दंडाच्या रकमेतून आता सौर ऊर्जेची निर्मिती महापालिका सुरू करणार आहे.

पुणे शहराचा विकास होत असल्याने कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून राज्य सरकारने १९९१ ला उरुळी देवाची- फुरसुंगी येथे १४३ एकर जागा दिली. त्यानंतर १९९९ ला कोथरूड येथील कचरा डेपो बंद करून शहरातील कचऱ्याच्या गाड्या उरुळी देवाची, फुरसुंगीला जाऊ लागल्या. शहरात रोज शेकडो टन कचरा निर्माण होत असल्याने या भागात कचऱ्याचे उंचच्या उंच डोंगर तयार झाले.

प्रक्रिया न करता उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची (ओपन डंपिंग) प्रचंड दुर्गंधी सुटू लागली. या भागातील प्रदूषण वाढल्याने गावकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली. एनजीटीमध्ये याचिका दाखल झाली. न्यायालयाने उघड्यावर कचरा टाकणे बंद करा असे आदेश दिले, त्यानंतर पुण्यात कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया २००७ मध्ये सुरू झाली, त्यात २०२२ मध्येही सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या १५ वर्षात महापालिकेने या कचरा डेपोवर पडलेला लाखो मेट्रिक टनाचे शास्त्रीय पद्धतीने कॅपींग करून हा परिसर दुर्गंधीमुक्त करण्याचे मोठे काम केले.

उरुळी देवाची येथील कचरा डेपो आणि प्रकल्पाच्या संदर्भात अनेक याचिका दाखल आहेत. त्यापैकी एका याचिकेत एनजीटीने महापालिकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याच रकमेतून या कचरा डेपोच्या परिसरात पर्यावरण पूरक कामे करण्याचे आदेश एनजीटीने दिले होते. त्यामध्ये कचऱ्यातील दुर्गंधीयुक्त पाणी (लिचेड) वाहून जाण्यासाठी गटारे बांधली, कचरा डेपोच्या जागेवर मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण करून तेथे हिरवळ फुलवली आहे. त्यानंतर आता सौर ऊर्जा निर्मितीसाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे.

१०० किलोवॉटचा प्रकल्प

कचरा डेपोच्या आवारात प्रक्रिया प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या मोठ्या शेडवर सोलर पॅनेल बसवून सौर ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. यासाठीच महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली . या प्रकल्पासाठी मे. पीईसी पॉवर इन्फा यांची एकच निविदा आली. त्यानुसार या कंपनीला हे काम ५६ लाख ७३ हजार ४७३ रुपयांना देण्यास स्थायी समितीने मान्य दिली आहे. याठिकाणी निर्माण होणारी ऊर्जा कचरा डेपोच्या आवारातील पथदिवे, वजन काटा, तसेच पंप हाउसच्या मोटारी, सीसीटीव्ही यंत्रणा यासाठी वापरली जाईल. अतिरिक्त वीज नेट मिटरींगच्या च्या माध्यमातून महापारेषणला विकली जाईल.

‘एनजीटीने महापालिकेला दंड केला होता, हा दंड पर्यावरण पूरक कामासाठी वापरला जात आहे. ५६ लाख रुपये खर्च करून १०० किलोवॅट वीज निर्मिती केली जाईल. ही वीज गरजेपेक्षा जास्त असल्याने अतिरिक्त वीज महापारेषणला विकण्याचे नियोजन आहे. तसेच या ठिकाणी आणखी जागा उपलब्ध आहे, त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यास वीज निर्मिती वाढवता येईल आणि त्यातून उत्पन्न मिळवणे शक्य आहे.’

- श्रीनीवास कुंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

‘एनजीटीच्या आदेशानुसार उरुळी देवाची येथे पर्यावरण पूरक कामे केली जात आहेत. त्याच माध्यमातून विद्युत विभागाला ५० लाखाची निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे.’

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.