धोकादायक खिळ्यांकडे पुणे महापालिकेचे दुर्लक्ष

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करताना बॅरिगेट्स सुरक्षीत रहावेत यासाठी त्याला खिळे मारण्यात आले होते.
nails
nailsSakal
Updated on
Summary

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करताना बॅरिगेट्स सुरक्षीत रहावेत यासाठी त्याला खिळे मारण्यात आले होते.

पुणे - सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करताना बॅरिगेट्स सुरक्षीत रहावेत यासाठी त्याला खिळे मारण्यात आले होते. काम झाल्यानंतर बॅरिगेट्स काढले, पण खिळे तसेच ठेवले. वाहनांचे टायर पंक्चर होत असून, दुचाकीस्वारांच्या पायाला मार लागत आहे. ठेकेदाराकडून हे काम व्यवस्थित झाले नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही खिळे काढलेले नाहीत.

महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यामध्ये स्वारगेटच्या दिशेने जाताना ब्रह्मा व्हेज हॉटेल ते संतोष हॉल चौक या दरम्यान पिलरचे सुरू केले. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याच्या दोन्ही बाजूने मध्यभागी लोखंडी बॅरिगेट्स खिळे मारून घट्ट बसविण्यात आले होते. पण आता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले झाल्याने वाहतुकीसाठी रस्ता मिळावा म्हणून हे बॅरिगेट्स काढून टाकले आहेत.

पण बॅरिगेट्स काढल्यानंतर सिमेंटच्या रस्त्यात मारण्यात आलेले खिळे पूर्णपणे काढून टाकलेले नाहीत. ते रस्त्यापासून अर्धा ते एक इंच वर आहेत. संतोष हॉलच्या सिग्नलवर दुचाकीचा वेग कमी होते, दुचाकीस्वार पाय खाली सोडून गाडी चालवत असतात, त्यावेळी त्यांच्या पायाला हे खिळे लागत आहेत. चारचाकी, दुचाकी पंक्चर होत आहेत. हे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी खिळे काढून टाकले असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात या रस्त्यावर खिळे आहेत.

‘सिंहगड रस्त्यावरील बॅरिगेट्स काढल्यानंतर खिळे न काढल्याने माझ्या कारचे दोन चाक पंक्चर झाले. पंक्चर काढताना चाकात खिळे अडकल्याने समोर आले. महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे आम्हाला नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी.’

- प्रमोद दिवाण, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.