पुणे - कोरोनाच्या साथीत महापालिका बेजार झाल्याचे प्रत्यक्ष उत्पन्नाच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. महापालिकेला चालू आर्थिक वर्षात तब्बल ७ हजार ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना गेल्या नऊ महिन्यांत जेमतेम सव्वातीन हजार कोटी रुपयांचे तिजोरीत जमा झाले आहेत. म्हणजे, महापालिकेला निम्मेही उत्पन्न मिळालेले नाही. पुढील तीन महिन्यांत आणखी पाचशे कोटी रुपयांचा महसूल वाढू शकतो, असा अंदाज आहे.
पुणेकरांसाठी नव्या योजना मांडतानाच जुन्या योजनेला गती देताना २०२१-२२ या वर्षासाठीचा सुमारे ७ हजार ३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एवढ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दिले होते. त्यामुळे नव्या योजना अमलात येण्याची आशा होती. मात्र आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच म्हणजे मार्चमध्ये कोरोनाची साथ आल्याने लॉकडाउन जाहीर झाले. परिणामी उत्पन्नावर परिणाम होऊन १५ जानेवारीपर्यंत ३ हजार २८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यातही मिळकतकराच्या अभय योजनेतून पाचशे कोटी रुपये मिळाले आहेत. त्याशिवाय सर्वाधिक उत्पन्न हे राज्य सरकारकडून वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) १ हजार ५३२ कोटी रुपयांचा समावेश आहे. एकूण जमा उत्पन्नापैकी आत्तापर्यंत २ हजार ९९३ कोटी रुपये खर्च झाले आहे.
असे मिळाले उत्पन्न
वस्तू व सेवा कर (जीएसटी) - १ हजार ५३२ कोटी
मिळकतकर - १ हजार १५
बांधकाम - २८२ कोटी
पाणीपट्टी - १५८ कोटी
अन्य सरकारी अनुदान - १५ कोटी
तोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात
नव्याऐवजी जुन्या योजनांना प्राधान्य
कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे निम्म्याने घटलेले उत्पन्न आणि नव्या, जुन्या विकासकामांवरील परिणाम या पाशर्वभूमीवर महापालिकेचे (२०२१-२२) या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक शुक्रवारी सादर होणार आहे. आर्थिक स्थिती पाहता नवे अंदाजपत्रक पुणेकरांसाठी नेमक्या कोणत्या योजना राहणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, आरोग्य खात्याला सक्षम करताना नव्याऐवजी जुन्याच योजनांना प्राधान्य राहण्याचा अंदाज आहे.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात सकाळी अकारा वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करतील.
कोरोनाच्या साथीत महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने सध्या तिजोरीत जेमतेम तीनशे कोटी रुपये उरले आहेत. त्यामुळे विकासकामे करताना महापालिकेपुढे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकाचा आकार कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचवेळी पुढील वर्षात महापालिकेची निवडणुक असल्याने महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकाकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.