Municipal Recruitment : पुणे महापालिकेत होणार कनिष्ठ अभियंत्याची भरती! किती मिळणार पगार?

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागां भरण्यासाठी आजपासून (ता. १६) अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे - राज्यभर शासनाच्या पदभरतीमध्ये घोटाळ्यांचा आरोप होत असताना पुणे महापालिकेने गेल्यावर्षभरात ७४८ जागांची भरती सुरळीत पार पाडली. त्यानंतर आता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांसाठी भरण्यासाठी आजपासून (ता. १६) अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

या पदासाठी मुळ वेतनासह भत्ते मिळून सुमारे ८० हजार इतका पगार आहे. विशेष म्हणजे अनुभव नसणाऱ्या अभियंत्यांनाही अर्ज भरता येणार असल्याने नोकरभरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महापालिकेची हद्दवाढ झाल्याने शहरातील कामे करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली होती. पण यामध्ये तीन वर्ष अनुभवाची अट असल्याने कागदपत्र पडताळणी करताना प्रशासनाची डोकेदुखी वाढली.

तक्रारी आल्यानंतर संशयित उमेदवारांची पुन्हा पडताळणी करावी लागली होती. मात्र, यावेळी अनुभवाची अट काढून टाकण्यात आल्याने प्रशासनाचे कामही कमी झाले आहे आणि नुकतीच पदवी, पदविका मिळविलेल्या उमेदवारालाही अर्ज भरता येणार आहे.

११३ जागांमध्ये १३ जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षित आहेत. तर १०० जागा सर्व प्रवर्गासाठी आहेत, असे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.

आयबीपीएस घेणार परिक्षा

ही भरतीची ऑनलाइन परिक्षा आयबीपीएसतर्फे घेण्यात येणार आहे. पद्धतीने 200 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. त्याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. गुणवत्ता यादीत येणाऱ्यांची कागदपत्र पडताळणीनंतर थेट नियुक्ती केली जाईल, असे इथापे यांनी सांगितले.

इथे करा अर्ज

www.pmc.gov.in

अर्ज करण्याचा कालावधी

१६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग - एक हजार

  • मागासवर्गीय प्रवर्ग - ९०० रुपये

  • माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक यांचे शुल्क माफ

वेतनश्रेणी

३८,६०० ते १,२२,८०० (यात भत्त्याचा समावेश नाही)

वयोमर्यादा -

  • खुल्या प्रवर्ग - ३८

  • मागासवर्गीय प्रवर्ग - ४३

  • माजी सैनिक, दिव्यांग - ४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()