Pune News : पूरस्थिती टाळण्यासाठी नाल्यांची वहनक्षमता वाढविणार; आयुक्त विक्रम कुमार

पुणे ‘शहराच्या काही भागांमध्ये झालेल्या पावसाळ्यातील पूरपरिस्थितीप्रमाणे यंदाही तशी परिस्थिती उद्‍भवू नये, यासाठी महापालिकेने तयारी केली आहे.
Commissioner Vikram Kumar
Commissioner Vikram KumarSakal
Updated on
Summary

पुणे ‘शहराच्या काही भागांमध्ये झालेल्या पावसाळ्यातील पूरपरिस्थितीप्रमाणे यंदाही तशी परिस्थिती उद्‍भवू नये, यासाठी महापालिकेने तयारी केली आहे.

पुणे - ‘शहराच्या काही भागांमध्ये झालेल्या पावसाळ्यातील पूरपरिस्थितीप्रमाणे यंदाही तशी परिस्थिती उद्‍भवू नये, यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. तसेच डोंगरउतारावरून येणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा, यासाठी नाल्यांची वहनक्षमता वाढविणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्याची दखल घेऊन महापालिकेकडून मागील वर्षापासून नाल्यांभोवती भिंती उभारणे, कलवड निर्मिती, नालेसफाई यासारख्या कामांवर भर दिला होता. दरम्यान, यावर्षीही महापालिकेकडून पावसाळ्यापुर्वीच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये नाल्यांची वहनक्षमता वाढविण्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Commissioner Vikram Kumar
Wild Boar Attack : रानडुक्कराच्या हल्ल्यात भाविकांची रिक्षा खोल दरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

याबाबत महापालिकेचे आयुक्त म्हणाले, ‘‘शहराभोवती अनेक डोंगररांगा आहेत. या ठिकाणावरून येणाऱ्या पाण्याला कुठेही अडथळा येऊ नये, याकडे आम्ही लक्ष देत आहोत. त्यासाठी नाल्यांमधील अडथळे दूर करून नाल्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला विनाअडथळा वेग प्राप्त होईल. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा प्रश्‍न येणार नाही.’

पुणे शहरामध्ये ७५ सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होते. मागील काही वर्षांमध्ये कमी पावसामध्ये सुद्धा शहरात पाणी साचण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे शहरात पाणी साठणाऱ्या ३६० ठिकाणांची कामे पूर्ण केली आहेत. पाणी साठणाऱ्या ठिकाणांची माहिती एका खासगी संस्थेमार्फत घेतली आहे, तेथे पाणी साचण्याचा प्रकार घडू नये, यादृष्टीनेही उपाययोजना केल्या जात असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.

Commissioner Vikram Kumar
Dnyandevi Pune Childline : पॉर्न अ‍ॅडिक्शनमुळे मुलांवरील दुष्परिणामांवर उपाय शोधणार

पुणे शहरात पावसाळापूर्व कामांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधित विभागाला पावसाळापूर्व कामांसाठी अधिक मनुष्यबळही पुरविणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ही कामे पूर्ण होतील.

- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.