Teachers Salary : मनपा शाळेतील शिक्षकांच्या पगार वाटपात गोंधळ

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पगाराची ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून महापालिकेला वर्ग केल्यानंतर शिक्षकांना दर महिन्याला पगार दिला जात होता.
 Teacher
Teacheresakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पगाराची ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून महापालिकेला वर्ग केल्यानंतर शिक्षकांना दर महिन्याला पगार दिला जात होता. पण शासनाने त्यांच्या धोरणात बदल करून पगाराची ५० टक्के रक्कम महापालिकेला न देता थेट शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या पगार वाटपात मोठा गोंधळ झाला असून, काही शिक्षकांच्या खात्यात १०० टक्के पगार जमा झाला आहे तर काहींना ५० टक्के, ४० टक्के अशी भिन्न रक्कम मिळाल्याने गोंधळ उडाला आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील कायम सेवेतील शिक्षकांचा ५० टक्के पगार संबंधित महापालिका करते. तर उर्वरित ५० टक्के पगार हा राज्य शासनाकडून केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून याच पद्धतीने पगार होत असताना राज्य शासनाने पगार वाटपाच्या धोरणात बदल केला.

राज्यातील अनेक महापालिकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे, तेथे कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे देखील शिल्लक नाहीत. त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली जाणारी ५० टक्के पगाराची रक्कम न देता थेट संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा पगार करताना शासनाकडून जमा करण्यात आला. पण पगाराची रक्कम ५० टक्के पेक्षा खूप जास्त किंवा कमी असल्याने नेमका पगार किती जमा झाला ने अनेकांना समजत नव्हते. शिक्षण विभागातील लिपिकांकडे चौकशी केली असता नेमकी पगाराची रक्कम किती हे कळाले नाही.

महापालिका, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सचिन डिंबळे म्हणाले, ‘राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या पगाराची ५० टक्के रक्कम पूर्वी महापालिकेकडे जमा केली जात होती. पण ती आता थेट शिक्षकाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. पण पगार वाटपात गोंधळ झाला असून, शिक्षकांना १०० टक्के, ६० टक्के, ४० टक्के अशी रक्कम जमा झाली आहे.

काहींच्या बँक खात्यात पगारच जमा झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांना पूर्वीप्रमाणे वेतन द्यावे. ही पद्धत बंद करावी.

‘शासनाकडून थेट शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा झाली आहे. पण पगाराच्या रकमेवरून शिक्षकांच्या तक्रारी आलेल्या असल्याने त्याबाबत पुढील कार्यवाही काय करावी यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे.’

- सुनंदा वाखरे, शिक्षण अधिकारी, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com