Pune News : प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना पुण्यात महापालिकेने पकडले तब्बल 300 किलो प्लास्टिक

महापालिकेने केंद्रीय प्लास्टिक विरोधी पथक स्थापन केले आहे.
Plastic Bags Ban
Plastic Bags Banesakal
Updated on
Summary

पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुण्यात येतात. या काळात प्लास्टिकचा वापर वाढू नये, यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

पुणे : प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी (Plastic Bags Ban) असतानाही होलसेल मार्केटमध्ये खुलेआम प्लास्टिक विक्री व पुरवठा केला जात आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation) स्थापन केलेल्या केंद्रीय प्लास्टिक विरोधी पथकाने आज (ता. २७) शहरात बंदी असलेल्या ३०० किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या वाहतूक करताना पकडल्या. तसेच १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई दुपारी दीडच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिरासमोर करण्यात आली.

पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुण्यात येतात. या काळात प्लास्टिकचा वापर वाढू नये, यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने केंद्रीय प्लास्टिक विरोधी पथक स्थापन केले आहे. आज दुपारी हे पथक जंगली महाराज रस्त्यावरून एका टेम्पोतून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांनी वाहतूक करत असलेल्या टेम्पोला महापालिकेच्या पथकाने पकडले.

Plastic Bags Ban
High Court कडून स्थगिती उठताच मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई; महापालिकेने पाडली 90 हजार चौरस फुटावरील बांधकामं

टेम्पो चालकाने माहिती देताना उडवी-उडवीची उत्तरे दिली. महापालिकेने कायद्यानुसार त्याला १० हजार रुपये दंडाची शिक्षा करून टेम्पोतील ३०० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार, आरोग्य निरीक्षक शाहू पोकळे, उमेश देवकर, राजेश रासकर, अमोल पवार, जालिंदर चांदगुडे यांनी ही करावाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.