Pune Municipal Corporation : अबब! कुत्र्यांना पकडण्यासाठी २० कोटी: पुणे महानगरपालिकेचा दावा

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणावर २० कोटी खर्च केल्याचा दावा केला आहे, परंतु नागरिकांच्या मते कुत्र्यांच्या संख्येत आणि हल्ल्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
stray dogs
stray dogssakal
Updated on

कात्रज : महापालिकेने अडीच वर्षांत भटकी कुत्री आणि मांजरांना पकडण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२३- २४ मध्ये सर्वाधिक ९ कोटी ३७ लाख ३३ हजारांचा निधी एकत्रित खर्च करण्यात आला आहे.

या काळात जवळपास एक लाख कुत्र्यांची निर्बिजीकरण आणि सव्वालाख कुत्र्यांचे लसीकरण केल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी ही सर्व फसवाफसवी असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.

महापालिकेकडून लसीकरण आणि नसबंदी जरी मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी प्रत्यक्षात अशा कुत्र्यांचा आकडा कमी झालेला दिसत नाही. महापालिकेची फसलेली नसबंदी आणि लसीकरण यात नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची घट होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोकाट कुत्री, मांजरांसाठी केलेला खर्च

वर्ष खर्च

२०२२-२३ ५ कोटी ९५ लाख १०हजार ३७५

२०२३-२४ ९ कोटी ३७ लाख ३३ हजार १०४

एप्रिलपासूनजुलै २०२४ ५ कोटी ५ लाख ४३ हजार ६६०

महापालिकेकडे शेकडो एकर जागा आहे, यात त्यांची सोय करावी. श्वानपथक केवळ कुत्र्यांना पकडून इकडचे तिकडे असेच करते. पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांना या माध्यमातून चुना लावला जातो, हे कुठेतरी थांबले पाहिजे. यावर ठोस उपाययोजना पाहिजे.

- संजय भोंडवे, नागरिक

प्रत्यक्षातील आणि महापालिकेकडील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत तफावत आहे. ज्या भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण केले आहे, त्यांच्या कानावर विशेष खूण असते. बहुतांश वेळा अशी खूण असलेली कुत्री नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. अनेक कुत्री नागरिकांवर प्राणघातक हल्लाही करतात, हे वेळोवेळी दिसून येते. सगळा काळा बाजार असून, यावर महापालिका आजपर्यंत ठोस उपायोजना करण्यात अयशस्वी ठरली आहे.

- समीर साबळे, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.