Pune : सार्वजनिक चेंबर स्वच्छ करण्यासाठीसुद्धा पैसे द्यायचे का? ; महिला संतप्त

महिलांचा संतप्त सवाल : काळेबोराटेनगर-नेहरू पार्कमधील चेंबर तुंबले
Undri public chamber water road issue
Undri public chamber water road issue
Updated on

उंड्री : पाणी नाही, रस्ते नाही, पथदिवे नाहीत, सार्वजनिक रस्त्यावरील चेंबर स्वच्छ करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, तर पालिकेला कर कशासाठी भरतो, असा संतप्त सवाल काळेबोराटेनगर नेहरू पार्क (स.नं.49) येथील गल्ली क्र.1 व 2 मधील लक्ष्मी घारे, लक्ष्मी साळुंके, सुनीता रायकर, छाया दांगट यांच्यासह स्थानिक महिलांनी उपस्थित केला.

प्रा. शोभा लगड म्हणाल्या की, नेहरू पार्कमधील गल्ली क्र.1 व 2मधील मलवाहिनी तुंबली आहे, चेंबर तुटले आहेत. त्यामुळे त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. घरातून बाहेर पडता येत नाही, दारात दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे.

पालिका प्रशासनाकडे तक्रार केली, तर दखल घेतली जात नाही, चेंबर स्वच्छ करण्यासाठी गोल आणि चौकोनी चेंबर असा वाद घालून दुरुस्तीसाठी आलेले कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची अशी विचारणा त्यांनी केली.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घराबाहेर पडताना अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दुर्गंधीमध्ये राहण्यासाठी आम्ही दरवर्षी कर भरतो का, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली, तर गोल आणि चौकोनी चेंबर असा वाद करतात.

-छाया दांगट, नेहरू पार्क, काळेबोराटेनगर

मलवाहिनी दुरुस्तीसाठीची मशीन आठवड्यातून एकच दिवस असते, ती कुठे कुठे पाठवायची असे सांगितले जाते. मलवाहिनी आणि चेंबर दुरुस्तीसाठी पैसे द्यावे लागतात. आम्ही कर कशासाठी भरतो. तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही.

-रामराव वाघमारे, ज्येष्ठ नागरिक

दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी आलेली की, गोल आणि चौकोनी चेंबरचा वाद करतात. पैसे घेतल्याशिवाय दुरुस्ती केली जात नाही. मागिल तीन महिन्यांपासून येथे चेंबरमधील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

-किरण नाडे, नेहरू पार्क, काळेबोराटेनगर

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, परतीच्या पावसाचे पाणी वाहून जाण्यात अनेक ठिकाणी अडचणी आल्याने नागरिकांकडून चेंबर उघडले गेले आहेत. त्यामुळे चेंबरमध्ये गाळ साचला असल्याची शक्यता. लवकरच मलवाहिनी आणि चेंबर दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.