पुणे महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी पर्यावरणपूरक ई-मोटारी घेणार भाड्याने

पेट्रोल, डीझेलच्या किमती गगनाला भिडत असताना महापालिकेने आता अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी पर्यावरणास पूरक ई मोटारी भाड्याने घेण्यात येणार आहेत.
Pune Municipal
Pune MunicipalSakal
Updated on

पुणे - पेट्रोल, डीझेलच्या किमती गगनाला भिडत असताना महापालिकेने (Municipal) आता अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी पर्यावरणास पूरक ई मोटारी (E-Motor) भाड्याने (Hire) घेण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव (Proposal) स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. ३५ ई-मोटारींसाठी आठ वर्षासाठी महापालिका २३ कोटी २८ लाख रुपये टप्पटप्प्याने देणार आहे. (Pune Municipal Corporation Will Hire Eco Friendly ECars for Officers)

महापालिकेच्या ताफ्यात ऍम्बेसिडर, इंडिका, इंडिगो, मांझा, टोयाटो अल्टीस, सियाझ, टाटा टियागो, कोरोला, ईटीओस आणि स्विफ्ट डिझायर या १०७ मोटारी आहेत. तर जीप, इको व्हॅन आणि इंडिका या कंपनीच्या ८० मोटारी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या प्रत्येक वाहनासाठी महापालिकेला प्रती महिना १७५ ते २०० लिटर डिझेल किंवा पेट्रोल लागते.

Pune Municipal
संदीप मोहोळ खून प्रकरण खटला लांबल्याने पोलिस तपासावर न्यायालयाचे ताशेरे

इलेक्ट्रीक मोटारींमुळे पारंपारिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यासही मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई मोटारी भाडेतत्वावर पुरविण्यासाठी विचारणा केली होती. त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह ८ वर्षे भाडेतत्वावर देण्याची तयारी दाखवली हे. ८ वर्ष कारचा वापर केल्यानंतर किमतीच्या ५ टक्के रक्कम भरून या गाड्या पालिकेच्या मालकीच्या होऊ शकतात. ३८ वाहनांसाठी चालकासह २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार आहे.

प्रत्येक महिन्याला वाचणार ४,६५५ रुपये

पेट्रोल, डिझेलवरील मोटारींसाठी प्रत्येक महिन्याला ६३ हजार रुपये इंधन खर्च येतो. ई मोटारीसाठी एका महिन्यासाठी ५८ हजार ३५० रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक मोटारीमागे प्रति महिना सरासरी ४ हजार ६५५ रुपये बचत आहे. ३८ वाहनांसाठी दरमहा १ लाख ७७ हजार रुपये खर्च कमी होणार आहे, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.