पुणे : पुणे महानगरपालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक पुण्याचे खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखाली लढविली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीच गुरुवारी (ता.१०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. या घोषणेमुळे गिरीश बापट हेच पुणे शहरातील भाजपचे नेते असणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग आणि अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोना लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभापुर्वी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
पुणे महापालिकेचा विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ पुढील वर्षी १५ फेब्रुवारीला संपत आहे. यामुळे पुढील वर्षीच्या जानेवारी अखेरीस महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र पुणे पालिकेची आगामी निवडणूक भाजप कोणाच्या नेतृत्त्वाखाली लढणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पाटील यांच्या या घोषणेमुळे आता भाजपचा कार्यर्कत्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.