पुणे : फिरत्या हौद निविदेत नियमांचे उल्लंघन, कारवाईची मागणी

पुणे महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात फिरत्या हौदाची व्यवस्था केली होती.
pune ganpati visarjan Movable Tank
pune ganpati visarjan Movable TankSakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात फिरत्या हौदाची व्यवस्था केली होती.

Summary

पुणे - महापालिकेने गणेशोत्सवात गरज नसतानाही तब्बल एक कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढून १५० फिरते हौद घेतले. पण या निविदेत फिरत्या हौदांसाठी जी वाहने वापरण्यात आली, त्यामध्ये अनेकांचा विमा संपलेला होता, १० वर्षांपेक्षा जास्त वापर झालेली वाहने वापरण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून समोर आले आहे.

पुणे महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात फिरत्या हौदाची व्यवस्था केली होती. यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने या फिरत्या हौदाची गरज नाही असे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका होती, पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही निविदा काढली. यामध्ये ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत १५० फिरते हौद पुरविण्यात आले. महाराष्ट्र लहुजी आर्मीचे विशाल सकट यांनी माहिती अधिकार कायद्यातून यासंदर्भात माहिती मागवली. त्यामध्ये त्यांनी वाहनांची माहिती, विमा, पीयूसी ही माहिती मागवली होती, पण याची अपुरी माहिती प्रशासनाने दिली. ही निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आलेली नाही. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या निविदेचे बिल आदा करू नये व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सकट यांनी केली आहे.

१५० पैकी अनेक वाहनांचा विमा हा यापूर्वीच संपलेला होता, त्याचे नुतनीकरण न करता ती वाहने विसर्जनासाठी वापरली. सर्व वाहनांचे आयुर्मान १० वर्षाच्या आत असावे अशी अट होती, पण अनेक वाहने, ११ वर्षापेक्षा जास्त काळ धावलेली होती. ज्या वाहनांचा वापर करण्यावर बंदी होती ती वाहने विसर्जनात वापरली. असे अनेक अटींचे यात उल्लंघन झाले आहे, असा आरोप सकट यांनी केला आहे.

घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या, ‘फिरत्या हौदाचे अद्याप बिल दिले गेलेले नाही. या निविदेसंदर्भातील ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.