Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता

Pune Mahapalika Atikraman:पाणी चारही दिशांना बंद पाईपलाइनद्वारे नेऊन पुढे नाल्यात सोडावे अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केल्या
Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Updated on

Vishrantwadi: नाला, पावसाळी वाहिन्यांवर घरे बांधणाऱ्या कलवड वस्तीमधील ८५ जणांना महापालिका बांधकाम विभागाने नोटीस दिल्या आहेत. राहत्या घराना नोटीस आल्याने रहिवासी भयभीत झाले होते. मात्र आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी करत महापालिका अधिकाऱ्यांना वस्तीमध्ये आणून रहिवाशांच्या घरांवर कारवाई न करता पावसाचे पाणी चारही दिशांना बंद पाईपलाइनद्वारे नेऊन पुढे नाल्यात सोडावे अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कलवड वस्तीची पाहणी करण्यासाठीं आमदार सुनील टिंगरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त चंद्रसेन नागटिळक, कनिष्ठ अभियंता नितिन चांदणे, सुहास अलबर यांसह अधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Pune Municipal Corporation : महापालिकेची निर्मल वारी, अडीचशे टन कचऱ्याचे संकलन

मागील पावसात कलवडमध्ये पूर परिस्थती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी गेले होते. सखल भागांत सुमारे १० फूट पाणी साचले होते. यावेळी प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काही दिवसांनी महापालिका बांधकाम विभागाने नाला, पावसाळीवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांवर घरे बांधणाऱ्या सुमारे ८५ जणांना स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कारवाई करू अशी नोटीस दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने नागरिक प्रचंड घाबरले होते. रहिवाशांनी आमदार सुनील टिंगरे यांची भेट घेउन घरे वाचवण्याची विनंती केली.

आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करून घरे वाचवून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कलवड भागांत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाहणी केली. आमदार टिंगरे यांनी कलवडमधून सखल भाग असलेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्याच्या मलनिसांरण विभागाला सूचना देऊन काम करण्याच्या सूचना केल्या. घरांवर कारवाई होणार नसल्याने नागरिकानी मात्र समाधान व्यक्त केले.

Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Pune Municipal School : डीबीटी रक्कम निश्‍चितीसाठी वेळखाऊ प्रक्रियेला फाटा; मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना होणार फायदा

आमदार टिंगरे म्हणाले, गेली अनेक वर्षे नागरीक या परिसरात वास्तव्य करत आहेत. नाला, पावसाळीवाहिन्यावर जर बांधकामे झाली असतील, तर त्याच वेळी बांधकाम करताना महापालिकेने ते थांबविणे आवश्यक होते. आता राहत असलेल्या घरांवर कारवाई करून नागरिकांना बेघर न करता पावसाळी लाइन टाकता येतात हे अधिकाऱ्यांना जागेवर आणून दाखवून दिले. त्यानुसार काम करण्याचा सूचना केल्या.

Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Pune Municipal Corporation : आता बैठकांचा फार्स नको... ;पुणे महापालिकेकडून गरज अंमलबजावणीची

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे म्हणाले, मलनि:सारण विभागाला लाइन टाकण्यासाठी जेवढे अतिक्रमण काढायचे होते तेवढे बांधकाम विभागाने काढले आहे. पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी अडथळा ठरणारे आणखी काही अतिक्रमण जर काढावे लागत असेल तर काढावे लागणार आहे.

Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Pune Municipal Corporation : आता बैठकांचा फार्स नको... ;पुणे महापालिकेकडून गरज अंमलबजावणीची

मलनिःसारण विभागाचे अभियंता सुहास अलबर म्हणाले, आमदारांनी दाखवल्याप्रमाणे पाण्याचा निचरा होतो का याचा सर्व्हे करून काम केले जाईल.

Pune: पुण्यात चालणार मनपाचा बुलडोझर...८५ घर मालकांना बजावली नोटीस! नागरिकांची वाढली चिंता
Pune Municipal Corporation : महापालिका कार्यालयातच पाणीगळती ; दररोज हजारो लिटर पाणी वाया,विश्रांतीनगरमधील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.