Pune Murder: पुण्यात पुन्हा खून; प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या!

Pune Crime News: शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले.
Pune Murder: पुण्यात पुन्हा खून; प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या!
murder in punesakal
Updated on

Latest Pune Crime News: अनैतिक संबंधातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. या घटनेनंतर महिलेने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. परंतु महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली.

गोपीनाथ बाळू इंगुळकर (वय ३७, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२) आणि नितीन शंकर ठाकर (वय ४५, रा. कुरण, ता. वेल्हा, जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

--------

Pune Murder: पुण्यात पुन्हा खून; प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या!
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.