Pune Flood Water : मुठा नदीत वाहून गेलेला शाळकरी मुलगा बेपत्ताच; बेपत्ता मुलाची तक्रार देण्यासाठी कोणीही पालक आले नाहीत

पूना हॉस्पिटलजवळील मुठा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा बुधवारी (ता. ३१) तिसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागला नाही.
Pune-Flood Water
Pune-Flood Watersakal
Updated on

पुणे - पूना हॉस्पिटलजवळील मुठा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा बुधवारी (ता. ३१) तिसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागला नाही. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी कोणी पालकही अद्याप पोलिस ठाण्यात आलेले नाहीत. तसेच, पोलिसांनी या परिसरातील शाळांमध्ये चौकशी केली असता कोणी विद्यार्थी गैरहजर नसल्याचे सांगण्यात आले.

पूना हॉस्पिटलजवळील पुलाच्या कठड्यावर सोमवारी सायंकाळी एक शाळकरी मुलगा बसला होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो अचानक नदीपात्रात पडला. याबाबतची माहिती एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षास दिली.

तसेच, समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित केला. त्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी मुलाचा शोध घेतला. तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्रीपर्यंत शोधमोहिम राबविण्यात आली. महापालिका भवन, डेंगळे पूल, संगम पूल परिसरातील नदीपात्रात शोध घेतला. परंतु, मुलाचा शोध लागलेला नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

‘त्या’ व्यक्तीशीही संपर्क होईना -

नियंत्रण कक्षास माहिती देणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती मोबाईल उचलत नाही. पोलिसांनी या परिसरातील शाळांमध्ये चौकशी केली. परंतु शाळेत कोणी मुलगा गैरहजर नाही. तसेच, बेपत्ता झाल्याची कोणी तक्रार दिलेली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.