Pune Fire Accident : पुणे-नगर रस्त्यावर मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची महाकार्गो बस जळून खाक

पिंपरी - चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस (क्र. एमएच १४ बीसी ७२९१) चाकण येथून ऑईलचे बॅरेल व काही स्पेअर पार्ट भरून छत्रपती संभाजीनगर येथे चालली होती.
pune nagar road msrtc cargo bus fire traffic disturb for 2 hours
pune nagar road msrtc cargo bus fire traffic disturb for 2 hourssakal
Updated on

शिरूर : पुणे - नगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची महाकार्गो बस आज सकाळी जळून खाक झाली. साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर दोन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पिंपरी - चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस (क्र. एमएच १४ बीसी ७२९१) चाकण येथून ऑईलचे बॅरेल व काही स्पेअर पार्ट भरून छत्रपती संभाजीनगर येथे चालली होती. ही बस बोऱ्हाडे मळ्याजवळ आली असताना मागील बाजूने गरम वाफा येऊ लागल्याने चालक तळेकर यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली.

त्यावेळी मागील बाजू ज्वाळांनी वेढल्याचे त्यांना दिसल्याने त्यांनी उडी टाकून मदतीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारल्या. मात्र, ऑईलसह इतर ज्वलनशील पदार्थ या बसमध्ये असल्याने आगीचे मोठे लोळ उठले होते. त्यामुळे कुणीही पुढे जाण्याचे धाडस केले नाही. दरम्यान, शिरूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी रांजणगाव एमआयडीसी व शिरूर नगर परिषदेशी संपर्क साधल्यानंतर तेथील आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शिरूर मधील सागर वॉटर सप्लायर्स, संपत दसगुडे यांनीही ट्रॅक्टर ला जोडलेल्या पाण्याच्या टॅंकरने पाण्याचा मारा केला.

मात्र या कार्गोमधील ऑईलमुळे सुमारे दीड तासाहून अधिक काळ आग भडकत होती. त्यामुळे कार्गो जळून खाक झाली. आग विझवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी कार्गो चा केवळ सांगाडाच उरला होता.

दरम्यान, आगीचे लोळ परिसरात उठत असल्याने पुणे - नगर महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विस्कळीत वाहतूकीमुळे आगीचे बंब घटनास्थळी पोचण्यासही विलंब झाला.

आग विझविल्यानंतर उरलेला सांगाडा बाजूला करण्यातही बराच वेळ गेला. त्यामुळे सकाळी साडेनऊ पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी पोलिस पथकासह वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.