पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला सुरू

पहिल्या साथीदारांची साक्ष नोंदवली
डॉ. नरेंद्र दाभोलकर
डॉ. नरेंद्र दाभोलकरsakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्ष उलटल्यानंतर या प्रकरणाचा खटला अखेर सुरू झाला आहे. खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर बचाव पक्षाने साक्षीदाराची उलट तपासणी घेतली.

डॉ. दाभोलकर आठवड्यातून एक ते दोन वेळा सदाशिव पेठेतील अमेय अपार्टमेंटमध्ये राहत. ते राहत असलेल्या शेजारच्या सदनिकेत वास्तव्यास असलेले अविनाश धवलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संबंधित सदनिकेतून त्यांच्या वापराच्या काही वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. त्या प्रक्रियेत धवलभक्त हे पंच होती अशी माहिती, या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर
सातारा : एफआरपी वरुन 'स्वाभिमानी’ने रोखली ऊस वाहतूक

पोलिसांनी माझ्या समोर सदनिकेत पंचनामा केला होता. त्यातील काही वस्तू मी ओळखू शकतो, असे सांगत धवलभक्त यांनी त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या काही वस्तू ओळखल्या. पुस्तक, डायरी, कपडे असे काही साहित्य त्याचवेळी पोलिसांनी जमा केले होते. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी कामकाज पाहिले. ॲड. इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलट तपासणी केली. धवलभक्त यांनी केवळ पंचनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात काय होते याची कल्पना त्यांना नव्हती. तसेच पूर्ण घराचा पंचनामा त्यांच्यासमोर झाला नाही, असा युक्तिवाद ॲड. इचलकरंजीकर यांनी केला.

या खटल्यास सरकारी वकिलांना साहाय्य करीत बाजू मांडण्याची संधी मिळण्याबाबत ॲड. ओंकार नेवगी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास न्यायालयाने मंजूर दिली आहे. ॲड. नेवगी हे दाभोलकर कुटुंबीयांचे वकील आहेत. ॲड. आव्हाड यांनी डॉ. दाभोलकर यांच्या शवविच्छेदनाची सीटी आणि त्यांच्या एक्स रे ची कॉपी मिळण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने सीबीआय ऐवजी आमच्याकडे या कॉपी सुपूर्द कराव्यात, असे त्यांच्या अर्जात नमूद होते. त्यानुसार न्यायालयाने संबंधित यंत्रणेस या कॉपी बचाव पक्षास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. खटल्याची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यात फिर्यादी असलेले तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नारायण रानगट यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर
जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत करण्यात : धनंजय मुंडे

त्या पिस्तुलाचा अहवाल सादर करावा :

या प्रकरणातील आरोपींना गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल ठाण्यातील खाडीत टाकून दिल्याचे तपासात समोर आले होते. सीबीआयने दुबर्इतील एका संस्थेद्वारे या

पिस्तुलाचा शोध घेतला होता. त्याबाबत अहवाल अद्याप सादर केलेला नाही. तो सादर न्यायालयात सादर करण्याची मागणी ॲड. इचलकरंजीकर यांनी केली. या खटल्यात एकूण ७०० साक्षीदार असून त्यातील ३२ साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. तर बचाव पक्षाचे सुमारे ८० साक्षीदार आहेत.

कारागृह अधीक्षकांना म्हणणे सादर करण्याच्या सूचना :

मला आठवड्यातून एक दिवस व्हीसीद्वारे वकील आणि कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र बोलू दिले जात नसल्याची तक्रार डॉ. वीरेंद्र तावडे यांनी न्यायालयात केली. त्यावर कारागृह अधीक्षकांना म्हणणे सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत, अशी माहिती ॲड. इचलकरंजीकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()