"मला जाऊ द्या ना आत"; मोदींच्या सभेला जाण्यासाठी नगरसेवकाचा वाद

त्यामुळे काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला.
Modi
ModiSakal
Updated on

पुणे : ‘‘अहो, मी नगरसेवक आहे. मला जाऊ द्या न आत’’ असे महाराष्ट्र टेक्निकल इंन्स्टिट्यूटवरील (MIT) सभा स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणी पोलिसांना सांगत होता. त्यावर पोलिस म्हणाले, ‘‘तुम्ही एकटे नगरसेवक नाहीत तुमच्या आधीच चार नगरसेवक येऊन थांबले आहेत’’ असे चेक पोस्टवरील पोलिस अधिकाऱ्याने दिले. त्यामुळे काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या दोन-तीन तास आधीपासून सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढू लागली. हातात भारतीय जनता पक्षाचा झेंडा, डोक्यावर पक्षाच्या चिन्हाची टोपी आणि मोदी यांचे छायाचित्र असलेला भगवा टि-शर्ट घालून कार्यकर्त्यांच्या झुंडी सभा स्थळाच्या दिशेने पुढे सरकत होत्या. ‘एमआयटी’च्या मैदानापर्यंत पोचण्यापूर्वी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून प्रत्येक जण पुढे सरकत होता. सकाळी सव्वादहा वाजता सभास्थळ कार्यकर्त्यांनी भरल्याचे निरोप आल्याचे पोलिसांना आले.

Modi
रखडलेला निपाणी-फोंडा मार्ग म्हणजे चंद्रकांत पाटलांची महान देणगी

त्यामुळे पोलिसांनी साडेदहा वाजल्यापासून बॅरिगेट्स् लावून रस्ता बंद केला. सभेसाठी आलेल्यांमध्ये नगरसेवक होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती होत्या. पत्रकार होते. या सर्वांना बॅरिगेटस् लावून अडविण्यात आले. त्यापैकी एक नगरसेवक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी गर्दीतून वाट काढत पुढे आले. ते म्हणाले, “साहेब, मी नगरसेवक आहे. मला आतमध्ये जाऊ द्या. माझ्याकडे पासदेखील आहे.” त्यावर अधिकारे म्हणाले, “साहेब, तुमच्यासारखे चार नगरसेवक या गर्दीत आहेत. सभेच्या ठिकाणी जागा नाही. त्यामुळे आता सोडता येणार नाही.”

या संवादानंतर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. ‘जयश्री राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. त्यानंतर गर्दीच्या पाठीमागून जोरदार ढकला-ढकली सुरू झाली. त्या रेट्याने पोलिसांना ओलांडून गर्दी पुढे गेली.

Modi
मंगळवेढा : वीजपुरवठा खंडित; महावितरण धोरणाने शेतकरी देशोधडीला

महिला पोलिसांचे प्रसंगावधान

पुढच्या सुरक्षा चौकीवर पुन्हा या गर्दीला अडविले. तेथे परत कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्या वेळी आपल्या आईबरोबर मोदींना बघण्यासाठी आलेली महाविद्यालयीन तरुणी घाबरली. “मला नाही बघायचं मोदींना. मला भीती वाटू लागली आहे. चल, आपण परत घरी जाऊ.” असे ती म्हणू लागली. पुरुषांच्या गर्दीत अडकलेल्या या दोन्ही महिलांना एका महिला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी या गर्दीतून त्या दोघींना बाजूला काढलं. त्या तरुणीला दिलासा दिला आणि गर्दी कमी झाल्यानंतर पुढे पाठविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()