Pune Nashik Highway:HIghway: हायवेवर थरार ! ३५ प्रवाशी असताना धावत्या एसटीची चाकं निखळली अन्...Video

नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्याच्या जवळ एक धडकी भरवणारी घटना
Pune Nashik Highway
Pune Nashik HighwayEsakal
Updated on

पुणे - नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्याजवळ एक धडकी भरवणारी घटना घडली. महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची मागची दोन्ही चाकं निखळली. एक चाक बसच्या पुढे तर दुसरं चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यात जाऊन पडलं. दोन चाकांशिवाय बस १५-२० सेकंद घासपटत पुढे गेली.

बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. मात्र, ऐनवेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील सगळे प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - नाशिक महामार्गावर धावणाऱ्या 'एस टी'ची मागची दोन्ही चाके अचानक निखळली.

Pune Nashik Highway
Monsoon News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मान्सून उशिराने दाखल होणार; तज्ज्ञ सांगतात...

त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडलं. पुढील काही सेकंदांसाठी बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. त्यामुळे बसमधील प्रवाशांत एकच खळबळ माजली आणि आरडाओरडा सुरू झाला.

परळ डेपोची बस क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरुन नारायणगावकडे निघाली होती. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ बस आल्यानंतर तिची मागची चाके निखळली.

या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत बसची मागील दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Nashik Highway
Maharashtra Politics: 'संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी तर उध्दव ठाकरे...', शिवसेनेच्या नेत्याचा सणसणीत टोला

बस घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र, हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

Pune Nashik Highway
Gulabrao Patil : 'चार खांदेकरी गेल्यानंतर एकटा ‘आग्या’ने काय करावे?' शिवसेना का सोडली याचं सांगितलं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()