मंचर- “खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर भोरवाडी-तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे बाह्यवळण रस्ता सुरुवातीच्या ठिकाणी चौकात उड्डाणपूल व नियोजित तांबडेमळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीपर्यंत एक किलोमीटर अंतरात दोन्ही बाजूने स्वतंत्र सर्विस रस्ता याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या जातील.” असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांनी निवेदन देऊन रस्त्यातील समस्यांची माहिती दिली.
मेदगे म्हणाले “भोरवाडी व तांबडेमळा येथील भुयारी मार्गाची उंची ४.२ मीटरने वाढवावी या मागणीसाठी भोरवाडी व तांबडेमळा ग्रामस्थांनी १५ दिवसांपूर्वी भुयारी मार्गाचे काम बंद पाडले होते. मी घटनास्थळी गेलो. ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गडकरी यांच्यासमवेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावू.असे आश्वासन दिले. त्यानंतर बंद केलेले भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले.
पण सध्या येथून मंचर शहराकडे ये-जा करण्यासाठी तयार केलेल्या चौकात लहान मोठ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.अपघात व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चौकात उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
सर्वीस रस्त्यामुळे नियोजित उपजिल्हा रुग्णालय व तांबडेमळा एसटी आगराकडे ये-जा करणारी वाहने व नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल. दरम्यान या मागण्या बरोबर असून सकारात्मक निर्णय घेऊ असे गडकरी यांनी सांगितले.”
या बद्धलची प्रतिक्रिया...
“भोरवाडी व तांबडेमळा येथील भुयारी मार्गाची उंची ३. ८ मीटर होती. ऊसाचे ट्रक व त्राक्त्र्त ये-जा करू शकणार नव्हते. त्यामुळे पुलाची उंची ४.२ मीटर करण्याविषयी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी तातडीने कार्यवाही केली.”
-अभियंता दिलीप मेदगे, समन्वयक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.