Traffic Issue : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ वाहतूक कोंडी; दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, रुग्णवाहिकांनाही फटका

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ भोरमळा -तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) संध्याकाळी सहा पासून संध्याकाळी साडे सातपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
pune nashik national highway traffic jam
pune nashik national highway traffic jamsakal
Updated on

मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ भोरमळा -तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) संध्याकाळी सहा पासून संध्याकाळी साडे सातपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.

रस्त्याचे एका बाजूनेसिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरात एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहन चालकांना अर्धा ते पाऊण तास वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी गेली आठवडाभरदररोज रात्री होत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

मंचरच्या दक्षिण बाजूला नंदी चौकापासून वरच्या गोरक्षनाथ टेकडी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे पूर्वी तेथे डांबरी रस्ता होता. आता तो उखडून सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हे काम सुरू केले आहे. पश्चिम बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू आहे. संबंधित ठेकेदाराचे सुरक्षारक्षकही वाहतूक सुरळीत करण्यासाठी तेथे थांबत नाहीत.

स्थानिक पोलीस प्रयत्न करतात. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. दररोज संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत एक ते दीड किलोमीटर अंतरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अशी माहिती त्रस्त झालेल्या वाहन चालकांनी दिली. रविवारी तर दोन रुग्णवाहिका ही वेळ येथे अडकल्या होत्या.

सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थिती विषयी भोरवाडी-भोरमळा येथे राहणारे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनीही या प्रकाराविषयी व वाहन चालकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांना येत्या दोन दिवसात गावकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटून होणाऱ्या वाहन कोंडीची माहिती देणार आहे.'

श्री क्षेत्र भीमाशंकर ला दर्शन घेऊन पुणे, मुंबई, कोल्हापूरला माघारी जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल बसलाही वाहन कोंडीचा सामना करावा लागला. या प्रकाराविषयी अनेक त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी सकाळ प्रतिनिधीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. दिवाळीपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे' अशी मागणी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

'रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम करणाऱ्या ठेकेदाराला वाहतूक कोंडी होणार नाही. याबाबत काळजी घेण्याच्या वारंवार सूचना दिलेल्या आहेत. पण तरीही वाहतूक कोंडी दूर करण्यात यश आलेले नाही. होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने पाठविला जाईल. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आवश्यक त्या धोरणात्मक उपयोजना हाती घेऊ.'

- दिलीप शिंदे अभियंता तांत्रिक सल्लागार पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.