Pune : पाषाण सुस जोडणाऱ्या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पाषाण सुस रस्ता येथील पाषाण सुसला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा
pune
punesakal
Updated on

बालेवाडी : राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पाषाण सुस रस्ता येथील पाषाण सुसला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोउद्योग संसदीय कार्यमंत्री आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ता.१६ सप्टेंबर रोजी पार पडला. मुख्यमंत्री कार्यक्रमास आँनलाईन उपस्थित राहणार होते. पण सततच्या पावसामुळे हे शक्य झाले नाही.

पाषाण सुस रस्ता येथील पाषाण सुसला जोडणारा हा उड्डाण पुल अतिशय महत्वाचा आहे. गेले १५ ते २० वर्षे पाषाण, सुस, म्हाळुंगे, नांदे, चांदे या भागातील नागरीकांना तसेच पुणे शहरातून यामार्गे मुळशी, कोकण हिंजवडीकडे जाण्यासाठी नागरिकांनी पूर्वीच्या अरुंद पुलामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या नविन पुलामुळे या भागातील नागरीकांना वाहतूक कोंडी पासुन सुटकरा मिळणारं आहे.

पुलासंदर्भात माहिती:-

महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापनाकडून वालेचा इंजिनिअरिंग ली. कंपनीला हे काम देण्यात आले.

*ह्या कामाची सुरुवात १३फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आली.

*पुलासाठी खर्च - ४१,३४,०५,८६५.८४/-

कामाचा कालावधी - ३०महिने.

*उड्डाण पुलाची एकूण लांबी -४७०मी.

रुंदी १२२मी.

पुलाची रुंदी (चौपदरी+पदपथ)-१७.२ मी.

*एकुण खांब संख्या १२.(३ रांगेत+ २ अबुटमेंट)

*पूर्णत्वाचा दाखला- -१३-९-२०२२.

अशी माहिती पुणे मनपा.प्रकल्प कार्यकारी अभियंता अजय वायसे, व वालेचा इंजिनिअरिंग ली. प्रकल्प व्यवस्थापक रामदास संकपाळ यांनी दिली.

या पुलाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आ. चंद्रकात पाटील यांनी या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ भोसले अस नामकरण करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच पुणे शहराला रहाण्याच्या दृष्टीने सुरक्षीत शहर म्हणून लोक पुण्याला पसंती देतात, त्यामुळे त्यांना सर्व सोई सुविधा देण्यासाठी निवडणुक झाल्या नंतर ही असे लहान मोठे प्रकल्प सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाठपुरावा करून जनहितासाठी पूर्ण करून घेतले पाहिजेत असे ते म्हणाले. त्याचं बरोबर या भागातील घन कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा ही या भागातील लोक प्रतिनिधीची मागणी असून यासाठी ही सर्व पक्षीय नेत्यांनी या साठी एकत्र येऊन काम केले पाहिजे अस ही ते म्हणाले.

तर कार्यक्रम प्रसंगी मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पाठपराव्यामुळे पूलास लागणारा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले, व या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ भोसले अस नामकरण करण्यात यावे अशी विनंती आ.चंद्रकांत पाटील यांना केली. तसेच या महामार्गालगत असणाऱ्या १२मी सर्व्हिस रस्त्यासाठी निधी मंजूर करावा अशी विनंती आ. पाटील यांना केली.

तर माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी हा कार्यक्रम सर्व पक्षीय केल्याबद्दल आ. चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले तसेच ते स्थायी समिती अध्यक्ष असताना या पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता असे सांगीतले, पण राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण कडून या कामास परवानगी मिळाली नाही. परंतु माजी महापौर मुरलीधर मोहोळ व माजी स्थाई समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या कार्यकाळात पुलास निधी मंजूर झाला. खा.सुप्रिया सुळे यांनी ही या कामासाठी खूप पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमास

विधानपरिषद उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन उपस्थित होत्या. तर माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बिडकर ,माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका अति .आयुक्त कुणाल खेमनार

भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे ,बाणेर बालेवाडी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर ,प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर तसेच या पुल बांधणीसाठी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असे प्रकल चे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला व इतर सर्व अभियंता उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.