Pune : कर्णबधिर व्यक्तिची ओळख पटेल अशी निशानी हवी

तो काय ओरडला हे न समजल्याने निरागसपणे तो पुढे गेला.
Deaf
Deafsakal
Updated on

कोथरुड - वाहनांच्या गर्दीतून वेगाने आपली दुचाकी दामटत निघालेल्या चालकाने सिग्नल मोडत आपली गाडी पुढे दामटली. पण पुढे रस्त्यावरुन चाललेल्या एका पादचा-यामुळे त्याच्या मार्गात अडथळा आला. जोरात हॉर्न देवूनही तो पादचारी लक्ष देत नसल्याने माथे भडकलेल्या चालकाने त्या पादचा-यापुढे गाडी आडवी लावत आरडा ओरडा करायला लागला. पादचारी कर्णबधीर असल्याने दुचाकीस्वार का हातवारे करतोय हे त्याला उशीरा समजले. इकडे दुचाकीस्वाराला देखील आपली चुक समजल्याने तो गुपचुप गाडी घेवून निघून गेला.

प्र. स. दंडवते म्हणाले की, पदपथावर अतिक्रमण असल्याने हा युवक रस्त्यावरुन चालला होता. तो मुकबधीर असला तरी इतरांना ते ओळखू येणे शक्य नव्हते. वाहनधारकाने त्यांच्या जवळ जाऊन अतिशय " वाईट शब्दात त्या व्यक्तिची निर्भत्सना करून कान बहिरा आहेस का " असे विचारले खरे.

Deaf
Deafness Issue: किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय बहिरेपणा; BMIचा धक्कादायक खुलासा

पण तो खरोखरच कर्णबधिर होता. तो काय ओरडला हे न समजल्याने निरागसपणे तो पुढे गेला. पांढरी काठी असेल तर ती व्यक्ती अंध आहे हे इतरांना समजते. मात्र कर्ण बधीर व्यक्ती ओळखण्याची अशी कोणतीही खुण नाही. तशी खूण वा निशाणी दिली तर असे प्रसंग घडणार नाहीत असे वाटते. तज्ञांनी त्याबाबत मार्गदर्शन करावे. कर्णबधिर व्यक्तिला तशी खूण दिली तर वर देख केलेल्या प्रसंगाची पुर्नरावृत्ती होणार नाही असे वाटले व कर्णबधिर व्यक्तिस समाजात निर्भयपणे वावरणे शक्य होईल.

Deaf
Deafness Issue: किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय बहिरेपणा; BMIचा धक्कादायक खुलासा

दिव्यांगासाठी काम करणारे अमोल शिनगारे म्हणाले की, अंध, अपंग व्यक्ती ओळखू येते. कर्ण बधीर व्यक्तींसाठी अशी विशिष्ठ खुण नाही. त्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत पुढाकार घ्यावा.

Deaf
World Deaf Day 2021: इचलकरंजीची पोरं लय हुशार! 13 कर्णबधिरांचे ॲनिमेशनमध्ये करिअर

सरिता वाघमारे म्हणाल्या की, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना असे लक्षात आले की, कर्ण बधीर व्यक्ती लगेच लक्षात येईल असे कोणतेही चिन्ह नाही. काणाला लावलेले मशिन पाहिल्यावर लक्षात येते की ही व्यक्ती कर्ण बधीर आहे. यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.