Pune News: रात्रीच्या वेळी शेतात समोर आला भला-मोठा बिबट्या, वाचा पुढे काय झालं

sakal
Pune News: Pune News: रात्रीच्या वेळी शेतात समोर आला भला-मोठा बिबट्या, वाचा पुढे काय झालं
Updated on

Pune News: केळीच्या पिकाला पाण्याचे बारे बदलले आणि गाडीत बसणार तोच समोर भला मोठा बिबट्या,आणि ज्या ठिकाणी बारे बदलले तेथूनच बिबट्या बाहेर आला, सुदैवाने चार चाकी गाडी होती म्हणून बरं झाल नाही तर काही खर नव्हतं अशी प्रतिक्रिया खडकी फाटा (ता.आंबेगाव) येथील युवा शेतकरी मयूर हगवणे यांनी दिली, ही घटना मंगळवार (ता.२८) रोजी रात्री ११ वाजता घडली आहे.

मंचर ते बेल्हा रस्त्याच्या बाजूला खडकी फाटा येथे दत्तात्रय हगवणे यांची शेती आहे,शेतात ऊस, केळी पीक सध्या आहे अशा प्रकारे मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा मयूर बारे बदलण्यासाठी केळीचा शेतात गेला होता.

sakal
Pune News : " ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई नको;होर्डिंग व्यावसायिकांची महापालिकेकडे मागणी

बारे बदलले आणि गाडीत बसला पण ज्या ठिकाणी बारे बदलले तेथूनच असलेल्या केळीच्या शेतातून बिबट्या बाहेर आला,आणि गाडी समोरच भला मोठा बिबट्या दिसला काही वेळ समोर शेतातील रस्त्याने रुबाबदार पणे चालत राहिला त्यानंतर चारचाकी गाडीचा प्रकाश पडत राहिल्याने शेतात निघून गेला.

या घटनेमुळे मयूरची चांगलीच धांदल उडाली पण चारचाकी गाडी होती म्हणून सुरक्षित राहिलो अन्यथा माझे काही खरे नव्हते समोर एव्हढा भला मोठा बिबट्या दिसल्यावर गाडीत होतो तरी भीती वाटत होती अशा वेळी दुचाकी वर असलो असतो तर काय झाल असत.

ज्या शेतात केळीच्या पिकाला पाण्याचे बारे बदलायला गेला असता त्याच केळीच्या प्लॉट मधून बिबट्या बाहेर आला पण चार चाकी गाडी होती म्हणून सुरक्षितता मिळाली ,बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता आणि केळीची ,उसाची शेती असल्यामुळे बिबट्याचा मुक्काम नेहमी या ठिकाणी असतो.

sakal
Pune Traffic : नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारावर वारंवार कोंडी;अरुंद रस्ता, अवजड वाहनांमुळे समस्या

परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून वनविभागाने तातडीने याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी दत्तात्रय हगवणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. चौकट:१)मागील ४० दिवसांपूर्वी जवळच असलेल्या माऊली नगर येथील शेतकरी नवनाथ वाबळे यांच्या घराजवळ पहाटे पासून दुपार पर्यंत बिबट्या खुल आम फिरत होता.

तो आजारी असल्यामुळे उठत बसत होता त्यानंतर वन विभागाने तो बिबट्या रेस्कु करून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेला होता,त्यानंतर परिसरात तीन ते चार बिबट्यांचा वावर होता.

प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी

मंचर बेल्हा रस्त्यापासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या खडकी फाटा जवळ असलेल्या केळीच्या शेतात हा बिबट्या दिसला आहे त्यामुळे सध्या बिबट्याकडून दुचाकी चालकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी गाड्यावर प्रवास करणाऱ्यानी काळजी घेणे गरजेचे आहे.

sakal
Pune : बालेवाडीतील पदपथ, मैदानांवर मांसाचे तुकडे;परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.