Pune News : मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हा गुणवंत पुरस्कारांची घोषणा

माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी होणार आहे.
pune
punesakal
Updated on

पुणे - जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ‘जिल्हा गुणवंत पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी अशा जवळपास ८१ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या बुधवारी (ता.४) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दुपारी दोन वाजता होणार आहे.

माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष सुजित जगताप यांनी केली.

पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, दत्तात्रय सावंत, राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील उपस्थित राहणार आहेत.

pune
Pune News : प्राध्यापिकेने बनविले बनावट ध्वनिफीत ओळखणारे सॉफ्टवेअर ; असली-नकलीची उकल काही मिनिटांत

पुणे शहरातील पुरस्कारार्थींची नावे :

- मुख्याध्यापकांची नावे : हनुमंत भांडवलकर (एरंडवणा माध्यमिक विद्यालय, कर्वे रस्ता), नंदकिशोर नगरकर (अभिनव विद्यालय हायस्कूल, नळस्टॉप), सोनल बारोट (आर.सी.एम. गुजराथी हायस्कूल, कसबा पेठ), लहू वाघुले (विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वानवडी)

pune
Pune News : घटस्फोटासाठी निकालापर्यंत दोघांची सहमती आवश्‍यक

शिक्षिकांची नावे : भाग्यश्री सुपनेकर (सुंदरदेवी राठी हायस्कूल, पर्वती), कल्पना शेरे (आयडियल इंग्लिश स्कूल, शनिवार पेठ), वैशाली वाघ (श्रीमती गुलबाई मुलुक इराणी कन्याशाळा, खडकी), मंगल शिंदे (नूमवि मुलींची शाळा, टिळक रस्ता)

शिक्षकांची नावे : संजय भामरे (मातोश्री गिन्नीदेवी मित्तल विद्यालय, आंबेगाव बुद्रूक), नितीन जगदाळे (साधना विद्यालय, हडपसर), आनंद परदेशी (रामराज्य माध्यमिक विद्यालय, बिबवेवाडी), निलोफर शेख (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे)

pune
Pune News : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत हडपसरमध्ये तेवीस टन कचरा झाला गोळा

शिक्षकेतर कर्मचारी : महेंद्र कोंढरे (चक्रधरस्वामी माध्यमिक विद्यालय, कात्रज), देवेंद्र पारखे (नूमवि मुलांची शाळा, बाजीराव रस्ता), सिद्धनाथ पवार (आ.बा.तुपे पाटील प्रगती विद्यालय, हडपसर), नवनीत भलकारे (शिवाजी माध्यमिक विद्यालय, आंबेगाव पठार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()