Pune News : बार्टीच्या अर्थसहाय्यासाठी २० तारखेपर्यंत करा अर्ज; एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना संधी

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.
barti
bartisakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत अशा उमेदवारांना आर्थिक सहाय्य केले जाणार असून, त्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (गट-अ व गट-ब), विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब), निरीक्षक, वैधमापन शास्त्र (गट-ब) आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब) मुख्य परीक्षा २०२३ साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. त्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. उमेदवाराचा १५ ते १८ सप्टेंबर २०२३ यादरम्यान जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी,

barti
Mumbai News: मुंबईत मराठीच चालणार! भर चौकात असलेली गुजराती पाटी उतरवली

स्थापत्य अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापन शास्त्र, आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा निकालाच्या यादीमध्ये समावेश असावा, अशी अट आहे. बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवारांनी mpscbanti.22@gmail.com या ई-मेल वर अर्ज करावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.