Pune News : जनरल मोटर्समधील एक हजार कामगारांचे कुटुंबीयांसह साखळी उपोषण

जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगावमधील प्रकल्प ह्युंदाई मोटर्सला विकला जात आहे.
p[une
p[unesakal
Updated on

वडगाव मावळ - तळेगाव एमआयडीसीत नवीन येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहित नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात, सुमारे एक हजार कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या पाच हजार लोकांचा निर्माण झालेला जीवनमरणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय ह्युंदाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मोटर्स कंपनीच्या सुमारे एक हजार कामगारांनी सोमवारपासून येथे कुटुंबीयांसह बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

जनरल मोटर्स कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील, खजिनदार अमोल खाडे, प्रकाश टिळेकर, प्रवीण फरगडे, अमोल ढोले, प्रमोद साळवी, चंद्रकांत अळसुंदकर आदी पदाधिकाऱ्यांसह सुमारे एक हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

p[une
P. V. Sindhu : आशियाई स्पर्धेत सिंधूकडून अपेक्षा नको

जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगावमधील प्रकल्प ह्युंदाई मोटर्सला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या एक हजार कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही.fg

p[une
Vitamin D : शरीरात किती प्रमाणात असते व्हिटॅमिन डी ची गरज, सप्लिमेंट्स कधी घ्यावेत? इथे वाचा सविस्तर

त्यामुळे हजारो कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत न्याय मिळण्यासाठी शासनाकडे वारंवार बैठकीसाठी विनंती केली जात आहे परंतु शासनाकडून कामगार प्रश्नाबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नाही. कामगारांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे साखळी उपोषण आंदोलन सुरू केल्याची माहिती अध्यक्ष भेगडे व सचिव पाटील यांनी दिली.

p[une
Sangali News: नवऱ्याच्या सुट्टीसाठी पत्नीने डेपोतचं झोपून केले ठिय्या आंदोलन

दिवसभरात आमदार सुनील शेळके, भाजपचे प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, किशोर भेगडे, रवींद्र भेगडे, मयूर ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, रूपेश म्हाळसकर, राजेंद्र जांभूळकर आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘‘सरकारने एकाच बाजूने विचार न करता कामगारांनाक न्याय मिळेल आणि नवीन येणाऱ्या कंपनीच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही, यासाठी लवकर मार्ग काढावा. बुधवारपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार व कंपनी जबाबदार राहील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.