Pune News: सासू-सासऱ्यांचा बंगला खाली करा, छळ करणाऱ्या सुनेला न्यायालयाचा दणका!

law-court
law-court
Updated on

पुणे: ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासू-सासऱ्यांना त्यांच्याच बंगल्यात राहून शारीरिक व मानसिक त्रास देत पैशांसाठी छळ करणाऱ्या सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. सासू-सासऱ्यांच्या मालकीचा बंगला पंधरा दिवसांत खाली करण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांच्या न्यायालयाने सुनेला दिला आहे.

या प्रकरणातील सुनेने पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला होता. राहण्यासाठी घर द्यावे आणि दरमहा एक लाख रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. न्यायालयाने या दाव्याची दखल घेत ऑगस्ट २०२१ मध्ये सुनेला सासू-सासरे यांच्या बंगल्यातील एक खोली राहण्यासाठी देण्याचा आदेश दिला होता. (crime news)

त्यानुसार सून त्या खोलीत राहत होती, तर पोटगीचा दावा अद्याप प्रलंबित आहे. महिलेचा पती जानेवारी २०२२ पासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे सासू-सासरे आणि सून असे तिघेच बंगल्यामध्ये राहत आहेत. सून डॉक्टर असून, ती प्रॅक्टिस करत नाही.

सासू-सासरे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना त्रास न देण्याचा आदेश न्यायालयाने अटींसह ऑगस्ट २०२२ मध्ये सुनेला दिला होता. मात्र, सुनेने सासू-सासऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच आर्थिक छळ केला. सासू-सासरे हृदयविकाराचे रुग्ण असल्याने सुनेकडून होणारा त्रास त्यांना सहन न झाल्याने त्यांनी अ‍ॅड. सागर भोसले यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला.

सून त्रास देत असल्याने तिला बंगल्यात राहण्यासाठी दिलेला आदेश बदलण्याची मागणी या अर्जाद्वारे केली होती. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान पतीने पत्नीला भाडेतत्त्वावर घर देण्याचे ठरविल्याने न्यायालयाने सुनेला सासू-सासऱ्यांचे घर १५ दिवसांत खाली करण्याचा आदेश दिला.

law-court
Rajinikanth Jailer Movie : जेलरचा धिंगाणा! तर रजनीकांत झारखंडमधील राजरप्पा मंदिरात भक्तीत तल्लीन

सुनेला मिळणार २५ हजार रुपये घरभाडे

सुनेला बंगला सोडण्याचा आदेश देताना न्यायालयाने तिच्या घरभाड्याची तरतूद या निकालात केली आहे. सुनेला तिच्या पतीने दरमहा २५ हजार रुपये घरभाडे द्यावे, असे निकालात नमूद केले आहे. या निर्णयामुळे पत्नी बेघर होणार नाही.  (latest pune news)

सासू-सासरे ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांना शांत आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्रास देणाऱ्या सुनेला सासू-सासऱ्यांच्या मालकीच्या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा संदर्भ आम्ही सुनावणीदरम्यान दिला. सुनेच्या त्रासामुळे सासू-सासरे वैतागले आहेत, असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. 

ॲड. सागर भोसले

law-court
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर राज्यातील दोन 'पाटील'; नगर अन् जळगावचा घेतला आढावा, दिला हा कानमंत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.