Pune News : शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजोबांनी बक्षीसपत्राद्वारे ३९ गुंठे जमीन दिली होती.
bribe
bribeesakal
Updated on

पुणे - सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुरंदर तालुक्यातील दिवे गावात ही कारवाई केली.

याबाबत एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यावरून पुणे ग्रामीणच्या सासवड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तलाठी नीलेश सुभाष गद्रे (वय ४२, रा. सोनोरी, ता. पुरंदर) आणि आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१, रा. वजपुरी, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजोबांनी बक्षीसपत्राद्वारे ३९ गुंठे जमीन दिली होती. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याने सोनोरी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी गद्रे यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने सापळा लावून कुंभारकरला लाच घेताना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.