Pune News : पोलिसठाण्यासमोरील बेवारस मोटारीत आढळला मृतदेह

ही घटना आज (ता. ६) चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
Crime
Crimesakal
Updated on

हडपसर - येथील पोलिसठाण्यासमोरील एका जुन्या वॅगनार वाहनात पोलिसांना एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह या गाडीत मागील चारपाच दिवसांपासून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मृतदेहाची दुर्गंधी सुटली असून त्याला शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना आज (ता. ६) चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसठाण्यासमोरील उड्डाणपुलालगत एका जुन्या वॅगनार गाडीतील मागील सीटवर एक बेवारस पुरूष झोपलेला असून तेथे दुर्गंधी सुटली असल्याचे पोलिस शिपाई टाक यांनी पाहिले.

पोलिस उपनिरीक्षक खळदे व पोलीस हवालदार सकट यांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक इसम मागील सीटवर आडवा झोपलेला दिसून आला. गाडीचा दरवाजा ओढून पाहिला असता तो उघडत होता. या इसमाला खाजगी रूग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Crime
Talegaon Station Crime : चाकूने भोकसून तळेगावात तरुणाचा खून

दरम्यान, आजूबाजूला जमलेल्या नागरिकांपैकी अमित सतीश कांबळे (वय २०, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) याने ही व्यक्ती आपले वडील सतीश प्रभू कांबळे (वय ४५) असल्याचे सांगितले. त्यांना दारूचे व्यसन असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.

Crime
Jalgaon Crime News : वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

त्यामुळे ते सतत घर सोडून निघून जात होते. वीस दिवसांपूर्वी ते घरातून निघून गेले असल्याचेही त्याने सांगितले. यावेळी सतीश यांच्या पत्नी सुरेखा कांबळे (वय ३६) याही उपस्थित होत्या. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.