Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण

Latest Pune News: आता पावसाने पूर्णता उघडीप दिल्यानंतर रस्त्यांवर धुळीच्या साम्राज्याने कब्जा केला आहे.
Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण
Pune sakal
Updated on

निलेश चांदगुडे

Kirkitwadi : सलग आठ दिवस पाऊस झालेल्या संततधारेमुळे सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश पडत आहे. तर अगोदर सततचा पाऊस आणि आता धुळीचे साम्राज्य यामुळे स्थानिक नागरिक विशेषता दुचाकीधारक हैराण झाले आहेत.

मागील दोन आठवड्यापूर्वी पावसाने संततधार धरली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाचवतांना वाहनधारकांना भर पावसात दुचाकी चालवताना कसरत करावी लागत होती.आता पावसाने पूर्णता उघडीप दिल्यानंतर रस्त्यांवर धुळीच्या साम्राज्याने कब्जा केला आहे.

Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते खडकवासला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती असल्याने धूळ उडून वाहनचालकांच्या डोळ्यात जात आहे. आता तर ऊन पडल्यामुळे रस्ते कोरडे झाले असून डांबरी रस्त्यावरील कच बाहेर आली आहे. वाहन त्यावरून गेले की धुळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. यामुळे दुचाकी धारकांना पुढच्या मोठ्या गाडीच्या मागे वाहन चालवताना धुळीचा मारा सहन करत आपले वाहन चालवावे लागत आहे.

धायरीत असणाऱ्या आर एम सी प्लांटवरून येणारे डंपरच्या चाकात अडकलेली माती सिंहगड रस्त्यावर पडत असल्याने रस्त्याला मातीचे मोठमोठे ढीग तयार झालेले आहेत. रस्त्यावरील मातीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे समोरील वाहन दिसत नसल्याने दुचाकीस्वारांमध्ये अपघाताच्या घटनाही घडत असून, ज्याठिकाणी मातीचे ढीग आहेत तेथील स्वच्छता करून या मातीच्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

धायरी फाटा ते खडकवासला दरम्यानच्या रस्त्यावरून मोठे व अवजड वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते या धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होऊ शकतात. रस्त्यावर प्रचंड माती असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. ही धूळ रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये जात असल्यामुळे नागरिकांनाही या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण
काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी'

दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ राहत असल्याने उडणारी धूळ सरळ घरात येते. या धुळीमुळे रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्यांना खोकला, त्वचारोग आदींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर असणारी माती उचलावी अशी मागणी त्रस्त वाहनधारक व नागरिक यांचेकडून करण्यात येत आहे.

धुळीमळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. दवाखान्यात रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धुलीकरण श्वसनात जमा होतात. अँलर्जीचा त्रास होणार्‍यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे, असे त्रास होत आहेत. या धुलीकरणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत आहे. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत. हवेतील धुळीचे प्रमाण सरासरीपेक्षा वाढल्याने सर्दी खोकल्यापासून दम्यापर्यंत अनेक तक्रारी वाढत आहेत.

Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण
Porsche Accident Pune: विशाल अग्रवालच्या मित्राने चालकामार्फत गायकवाड व मकानदार यांना पैसे दिले

धुळीचा प्रभाव लहान मुलांवर जास्त जाणवतो. त्यांना अँलर्जीसारखा आजार जडू शकतो, तर अंगावर चट्टे उमटणे, पुरळ उठणे, त्वचा काळी पडणे, केस गळणे, कोंड्याचे प्रमाण वाढणे, अशाप्रकारचा त्रास धुळीमुळे होतो. धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि दम्यासारखे कायमस्वरूपी गंभीर आजार होतात. धुळीच्या आजाराचे दूरगामी गंभीर परिणामसुद्धा होतात.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांच्याशी आठ दिवसापासून दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलले नाहीत. ते फक्त "आपण नंतर परत कॉल करू शकता?" एवढाच संदेश येत आहे. त्यानंतर त्यांना फोन केला तर ते उचलत नाहीत तसेच त्यांनी एकही फोन केलेला नाही. हे असेच सुरू राहिले तर नागरिकांच्या अडचणी कश्या प्रकारे दूर होतील.

Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण
Pune Accident: डंपरची दुचाकीला धडक, आईचा मृत्यु तर मुलगा गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.